Ajit Pawar : शरद पवारांनी निर्णय घेतला आहे. पवार साहेबांच्या वयाचा विचार करता हा निर्णय योग्य आहे. भाकरी फिरवायची असते असे पवार साहेब स्वत: म्हणाले. मी आता काकींसोबत बोललो आहे. साहेब निर्णय मागे घेणार नाहीत.नवीन अध्यक्ष पवारांच्या मार्गदर्शनाखाली काम करेल.काळानुरुप काही निर्णय घ्यावे लागतात. साहेबांच्या डोळ्यादेखेत तयार होणारा नवीन अध्यक्ष तुम्हाला का नको आहे असा थेट सवाल कार्यकर्त्यांना अजित पवार यांनी करत सर्व नेत्यांना झापलं.
यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, काय तेच तेच लावलंय.साहेबांच्या मनात ज्या गोष्टी आहेत त्याच आपण करु. त्यांच्या मनाच्या बाहेर कोणतीच गोष्ट होणार नाही.शरद पवार फक्त अध्यक्ष पदावरून निवृत्त होणार आहेत. मात्र सर्व काम त्यांच्या नेतृत्वाखालीच चालणार आहे.त्य़ांच्या मार्गदर्शनाखाली नवीन अध्यक्ष तयार व्हायला पाहिजे. तुम्ही गैरसमज करून घेऊ नका ते पक्षातच असणार आहेत. आज काँग्रेसमध्ये अध्यक्ष खर्गे आहेत मात्र सोनिया गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसचे काम सुरु आहे. पवार साहेबांच्या वयाचा विचार करता नवीन नेतृत्वाकडे ही जबाबदारी देण्यात येणार आहे.ते नेतृत्व साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाचं काम करेलं.शेवटी साहेब म्हणजेच पक्ष आहे हे कोणी वेगळं सांगण्याची गरज नाही. ते लोकशाहीमध्ये जनतेच ऐकतात हे पाहत आलोय. पक्षाचा नवीन अध्यक्ष त्यांच्या मार्गदर्शनाखालीच काम करेल.भावनिक होऊ नका. पवार साहेबांचा निर्णय आपल्याला मान्य करावा लागेल अस म्हणत शरद पवारांच्या निर्णयाचं समर्थन अजित पवारांनी केलं.
Previous Articleमी पक्षातून बाजूला होत नाही,फक्त पदावरून दूर होत आहे-शरद पवार
Next Article विठ्ठल हलगेकर यांचा प्रचारसभांचा धडाका








