मुंबई : गेल्या अडीच वर्षामध्ये ठाकरे सरकारनं उत्तम काम केलं आहे. माविआ सरकारकडे सर्व बहुमत आहे. उद्धव ठाकरेंच्या पाठिशी राहून माविआ टिकवायची आहे. संध्याकाळी शरद पवार, (Sharad Pawar) प्रफुल्ल पटेल यांच्यासह मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी मातोश्री येथे जाणार आहोत. त्यानंतर उद्धव ठाकरेंशी चर्चा करून पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचं अजित पवारांनी (Ajit Pawar) सांगितलं. अजित पवारांना राज्यातील स्थिती माहिती आहे. परंतु, आसाम आणि गुवाहटी येथील स्थिती माहिती नाही असे वक्तव्य काल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं होतं. त्या वक्तव्याला उत्तर देण्याची माझी लायकी नाही असेही ते म्हणाले.
शरद पवार आमचं दैवत आहे त्यांच्या वक्तव्यावर बोलण्याची आमची लायकी नसल्याचं सांगत मुख्यमंत्र्यांच्या पाठिशी ठामपणे उभं राहणं राष्ट्रवादीचं काम आहे असेही ते म्हणाले. कोरोना काळात मुख्यमंत्र्यांनी मातोश्रीवरुन खूप काम केले. त्यामुळे त्यांनी वर्षा बंगला सोडला यावरुन बोलण्यात काही अर्थ नसल्याचेही ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी उभे राहायचे आहे ही राष्ट्रवादीची भूमिका असल्याचेही त्यांनी स्पष्ट केलं. आज संध्याकाळी ६:३० वाजता शरद पवार, प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत ते जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा- शिवसेनेचं बंड होणारच होतं; उदयनराजेंनी सांगितले यामागचं कारण
सरकार बहुमतात असून, सरकारला निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. विधीमंडळाबाबत अध्यक्ष निर्णय घेतील. आज सरकार बहुमतात आहे. त्यामुळे सरकारला निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यानुसार निर्णय घेतले जात आहे. अनेक मंत्री मुंबईत आहेत आणि सरकारचं काम अगदी सुरळीत सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









