Ajit Pawar : छत्रपती संभाजीनगरमधील मविआच्या वज्रमूठ सभेत उद्धव ठाकरेंसाठी वेगळी खुर्ची ठेवण्यात आली होती. यावरून राज्याच्या राजकारणात उलट- सुलट चर्चा रंगल्या. यावरून विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधत स्पष्टीकरण दिलं आहे. त्याचबरोबर अरविंद सावंत यांच्या वक्तव्यावरून स्पष्टीकरण दिलं आहे. मुघलांचा इतिहास पुस्तकातून काढला तरी इतिहासात नोंद राहील.इतिहासाला का घाबरता? असा सवालही योगी सरकारच्या निर्णयावर अजितदादांनी विचारला .
यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की,मविआच्या प्रत्येक सभेला सगळेच उपस्थित असतील असे नाही.प्रत्येक सभेत 2-2 नेते बोलतील असं धोरण स्वीकारलंय.सभेत गैरहजेरी म्हणजे नाराजी असं अजिबात नाही याची नोंद माध्यमांनी घ्यावी. उध्दव ठाकरेंना पाठीचा त्रास असल्यानं त्यांना वेगळी खुर्ची द्यावी लागली.सभेच्या ठिकाणी देखील अशीच खुर्ची ठेवण्यात आली होती. बाजूला दोघांसाठी सोफ्याच्या खुर्च्या ठेवल्या होत्या असंही ते म्हणाले.
अरविंद सावंत यांच्या वक्तव्यावर बोलताना ते म्हणाले की,शरद पवारांनी कायमच सर्वांचा आदर केलेला आहे. रिक्षावाला हा शब्द शरद पवारांचा नाही. रिक्षावाला हा सावंतांचा शब्द आहे, अस आज सावंतांनीच स्पष्ट केल्याचेही ते म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिग्रीच्या वादा संदर्भात बोलताना ते म्हणाले की, देशाने डिग्री बघून नाही, करिश्मा बघून मोदींना पंतप्रधान केलं. 9 वर्ष देशाचं नेतृत्व करणाऱ्या नेत्याच्या डिग्रीचा वाद का उकरला जातोय? असा सवालही त्यांनी आज केला.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








