Sharad Pawar Big statement : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा केली. यामुळे महाविकास आघाडीत अस्वस्थता निर्माण झालीयं. मविआचे महत्त्वाचे नेते वाय. बी. चव्हाण सेंटरला जाण्याची शक्यता आहे. पवारांच्या निवृत्तीच्या घोषणेनं ठाकरे गट, काँग्रेसची चिंता वाढलीयं. दरम्यान सभागृहात कार्यंकर्त्यांनी शरद पवारांनी निर्णय मागे घ्यावा असा आग्रह धरला. यावेळी विरोधीपक्ष नेते अजित पवारांनी कार्यकर्त्य़ांना शांत राहण्याची विनंती केली.
यावेळी कार्यकर्त्यांशी बोलताना अजित पावर म्हणाले की, समिती ठरवेल ते पवार साहेबांना मान्य असले असं शरद पवारांच म्हणंण आहे. या कमिटीमध्ये आपल्या राष्ट्रवादी पार्टीचे सदस्य आहेत. सुप्रिया सुळे, जयंत पाटील,मी आदी असतील. आम्ही देखील बाहेरचे नाही. तुमच्या भावना आमच्या लक्षात आल्या आहेत. तुमच्या मनातीलच निर्णय होईल, असे अजित पवारांनी सांगताच कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत आत्ताच शरद पवार यांनी निर्णय घ्यावा अशी मागणी केली. आता शरद पवार काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले. दरम्यान, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी अश्रू अनावर झाले.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी








