ऑनलाईन टीम/तरुण भारत
मनसे प्रमुख राज ठाकरे (raj thackeray) यांचा अयोध्या दौरा रद्द झाल्यांनतर प्रथमच त्यांनी आज पुण्यात सभा घेतली. या सभेत राज यांनी मुख्यमंत्री ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अनेक आंदोलन अर्धवट सोडली आहेत. अनेक भूमिका बदलल्या आहेत अशी टीका राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी केली होती. त्यांच्या या टीकेलाही राज यांनी प्रत्यत्तर दिलं आहे. आत राज ठाकरेंच्या या टीकेवरून राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटू लागल्या असून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) आपल्या भाषणातून शिवसेना प्रमुख बाळासाहेब यांची क्रेडिबिलीटी घालवत असल्याची टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ज्यांना जे बोलायचे आहे ते त्यांना बोलू द्या आम्ही विकासावर बोलणार असल्याचे अजित पवार म्हणाले आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज ठाकरे टीकेवर अजित पवारांनी प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांना जे बोलायचे आहे ते त्यांनी बोलावं, आम्हाला विकासाच्या मुद्द्यावर बोलायचे आहे. मी कालसुद्धा जळगाव, शहापूर, डहाणू सिंदखेडराजा ज्या ज्या भागात गेलो तिथे माझी भूमिका तीच आहे. ज्याच्यातून महाराष्ट्रातील मुलांना आणि मुलींना रोजगार मिळणार असेल. तसेच ज्याच्यातून जातीय सलोखा निर्माण होणार आहे. ज्याच्यातून कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती हाताळण्यासाठी पोलीस वर्गाला मदत होणार आहे. ह्या गोष्टीला आपण जास्त महत्त्व देऊ ना असे अजित पवार म्हणाले आहेत.