Ajit Pawar News : महाराष्ट्राच्या भल्यासाठी आम्ही सर्व एकत्र काम करणार आहोत.पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह आमच्याच सोबत आहे.आम्ही जे करतोय ते पक्षाच्या हिताचं करतोय. 9 जणांना नोटीस देणं कायदेशीर नाही. आम्हाला महाराष्ट्राचा विकास करायचा आहे. हे महायुतीचं सरकार राज्यात चांगली कामे करून दाखवेल, असा विश्वास देतो अशी हमी जनतेला अजित पवार यांनी दिली.यावेळी त्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या नेमणूकीविषयी आक्षेप घेतला. एकाच नेत्याला विरोधीपक्षनेता आणि प्रतोद नेमता येत नाही. असा आक्षेप जितेंद्र आव्हाडांच्या नेमणूकीवर घेतला.
शरद पवार हे आमचे गुरु आहेत. पक्ष सत्तेत आणून पवारांना गुरुदक्षिणा दिली. बहुसंख्य आमदार सोबत म्हणूनच अजित पवार आज उपमुख्यमंत्री झाले आहेत. जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाडांना अपात्र करण्याचं पत्र विधानसभा अध्यक्षांना दिल्याची माहिती अजितदादांनी दिली. अपात्रतेच्या कारवाई बद्दल बोलताना त्यांनी हि माहिती दिली.
जयंत पाटील यांच्यावर निशाणा साधताना ते म्हणाले की,रात्री 12 वाजता पत्रकार परिषद घेऊन निर्णय सांगितले जातायत.या निर्णयांमध्ये काही तथ्य नाही.असा टोला अजित पवारांनी जयंत पाटलांना लगावला. राष्टीय अध्यक्ष कोण असेल असा प्रश्न पत्रकारांनी करताच अजितदादा चिडले. तुम्हाला माहित नाही का? असा सवाल त्यांनी केला. पुढे ते म्हणाले की, राष्टीय अध्यक्ष शरद पवारच आहेत.
जयंत पाटील यांची प्रदेशाध्यक्षपदी हकालपट्टी केल्यानंतर सुप्रिया सुळे यांची हकालपट्टी करणार का? असा प्रश्न विचारल्यावर अजितदादा म्हणाले की, कुणाची हकालपट्टी करण्यासाठी पक्ष काढला नसल्याचे ते म्हणाले.पक्ष कुणाचा हा निर्णय निवडणुक आयोग घेतो.बंड केलं की नाही हे कायदा ठरवेल.आम्हाला महाराष्ट्राचा विकास करायचा आहे. हे महायुतीचं सरकार राज्यात चांगली कामे करून दाखवेल, असा विश्वास अजित पवार यांनी यावेळी दिला.
यावेळी रूपाली चाकणकर यांची महिला राष्ट्रवादी प्रदेश अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.तर अमोल मिटकरी, आनंद परांजपे यांची राष्ट्रवादी प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली. युवक काँग्रेसपदी सूरज चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती सुनिल तटकरे यांनी दिली.








