मुंबई : पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. लवकरात लवकर पूरग्रस्त भागाला मदत दिली गेली पाहिजे. अतिवृष्टी झालेल्या भागांना तातडीने मदत दिली गेली पाहिजे. पूरग्रस्तांना सरकारनं अद्याप मदत केली नाही. तातडीने पंचनामे केले तर शेतकऱ्यांना फायदा होईल. उशीरा पंचनामे केले तर अधिकाऱ्यांना काय दिसणार आहे? शेतकऱ्यांना संकटातून तातडीनं बाहेर काढणं गरजेचं आहे. यासाठी सरकारने तातडीने अतिवृष्टीचे पंचनामे करावे व तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली. पूरग्रस्तांच्या मदतीबाबत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्यासोबत चर्चा झाल्यानंतर अजित पवारांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मंत्रिमंडळ विस्तार, अधिवेशन, पूरग्रस्तांना मदत यावर चर्चा करण्यात आल्याचे सांगितले.
यावेळी बोलताना ते म्हणाले, शिंदे सरकारने अजूनही मंत्रिमंडळाचा विस्तार केला नाही. किंवा अधिवेशनही घेत नाहीत. पूरग्रस्त भागात उशीरा पंचनामे केले तर अधिकाऱ्यांना काय दिसणार आहे? असा सवाल त्यांनी यावेळी केला. राज्यपालांनी आमचे म्हणणे ऐकून घेतले आहे. राज्यात सध्या काय परिस्थिती आहे आणि सरकार काय करतय हे त्यांच्या निर्दशनास आणून दिले असल्याचेही ते म्हणाले.
मंत्रिमंडळाच्या विस्तारावरून मला राजकारण करायचे नाही. मात्र महिना होऊनही विस्तार न झाल्याने कामे रखडली आहे. अनेक जण कामे घेऊन येतात. मात्र, मंत्रिमंडळ नसल्याने कामे थांबली आहेत. पूरग्रस्तांना सरकारनं अद्याप मदत केली नाही. तातडीने पंचनामे केले तर शेतकऱ्यांना फायदा होईल. शेतकऱ्यांना संकटातून तातडीनं बाहेर काढणं गरजेचं असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
Previous Articleडोंबिवली शाखेत ठाकरे-शिंदे समर्थकांमध्ये राडा
Next Article नॅन्सी पेलोसींचा तैवान दौरा; चिनने दिला हा इशारा








