Ajit Pawar राज्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच एका गटाचा आणि बॉडी एका गटाची अशी अवस्था बऱ्याच ठिकाणी निर्माण झाली आहे. विरोधकांनी सुरू केलेल्या या पध्दतीमुळे यामुळे अनेक गावात पेच निर्माण होत आहे. तुम्हाला थेट सरपंच निवडायचा आहे तर थेट महापौर थेट का निवडत नाही. थेट मुख्यमंत्री का निवडत नाही. तसेच थेट पंतप्रधान का निवडत नाही. असा थेट सवाल त्यांनी सरकारला केला.
विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. चंदगड येथे ट्रॉमा केअऱ सेंटरचे उद्घाटन आणि नवनिर्वाचित सदस्यांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, “सर्व निवनियुक्त सरपंचांचे अभिनंदन. राजकारणात कायमचे वैर ठेउ नका. तुम्ही लोकांमधून सरपंच झाल्याने तुम्हाला एक चांगली संधी मिळाली तुम्ही आता गावचे कारभारी झाला आहात. गावाचा विकासासाठी केंद्राच्या, राज्याच्या, जिल्हा परिषदेच्या विविध योजना राबवून किंवा आमदार, खासदार निधीमधून कामं चांगल्या पद्धतीने करून घ्या.” असेही ते म्हणाले.
पुढे बोलताना, “शरद पवार यांच्या 55 वर्षांच्या राजकारणात त्यांनी बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार एकमेकांवर वेगवेगळ्या प्रकारे टीका करत. पण, ते प्रत्यक्षात भेटल्यावर एकमेकांशी खूप बोलत असतं. विचारसरणी वेगळ्या असू शकतात मात्र यात वैर ठेवता काम नये. महाराष्ट्रात सुसंकृत राजकारणाची परंपरा यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक आणि शरद पवारांची शिकवण दिली आहे.” असे ते म्हणाले. करवीरचे शाहू महाराज छत्रपतींचा त्यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त कोल्हापुरात एक चांगलं वातावरण निर्माण झालं आहे. यानिमित्त महाराजांना मी शुभेच्छा देतो असंही ते म्हणाले.
Previous Articleमुंबईत 1993 सारखा बॉम्बस्फोट होईल; पोलीस कंट्रोलला फोन
Next Article साहेबप्रेमी, बीआरडीएस अंतिम फेरीत








