Maharashtra Monsoon Session 2023 : पावसाळी अधिवेशनाचा आज पहिला दिवस आहे.पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक झाले आहेत.राज्य सरकारविरोधीत विरोधकांनी आंदोलन केलं.याचबरोबर अजित पवार गटाचे नेत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या भेटीला गेले होते. अधिवेशन सुरु होण्यापूर्वी त्यांनी नार्वेकरांची भेट घेतली. या अधिवेशनात अनेक कायदेशीर पेचप्रसंग निर्माण होऊ शकतात. त्यापार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची आहे.
यंदाचं पावसाळी अधिवेशन वादळी होण्याची शक्यता आहे. काल अजित पवार आणि काही मंत्र्यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती.दरम्यान,अधिवेशन सुरु होण्यापूर्वी विरोधकांनी सरकारचं लक्ष वेधण्यासाठी ‘खोके सरकार हाय हाय’च्या घोषणा दिल्या.सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.या आंदोलनात काँग्रेस आणि ठाकरे गटाचे आमदार सहभागी झाले. मात्र, शरद पवार गटाच्या आमदारांचा सहभाग नसल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.जयंत पाटील, राजेश टोपे, अनिल देशमुख यांचा या आंदोलनात सहभाग नव्हता, यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. त्यामुळे अधिवेशनात शरद पवार गट आणि अजित पवार गट यांची भूमिका काय असणार आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.








