पावसाळी अधिवेशानाचा दुसराही दिवस वादळी ठरला. पालघर (Palghar) जिल्ह्यातील हत्तीरोगा संदर्भात आरोग्य मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांच्यावर विरोधकांनी प्रश्नांचा भडिमार केला. मात्र सावंतांना याचे उत्तर देता नाही आले. यामुळे विरोधक आणखीन आक्रमक झाले. तसेच, बीड (Beed) जिल्ह्यासंदर्भात केलेल्या वक्तव्याने विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी आरोग्य मंत्र्यांना सुनावले. अखेर तो शब्दही पटलावरून काढून टाकण्यात आल्यानंतर विरोधक शांत झाले.
हत्तीरोगासंदर्भात आरोग्य मंत्र्यांनी तासाभरात उत्तर देण्याचे मान्य केले. पण विधानसभा अध्यक्षांनी सूचना करत विरोधी पक्षांना जी उत्तरे अपेक्षित आहेत, त्याची नीट माहिती घ्या. आपण हा प्रश्न राखून ठेवू, असे सांगितले. त्यानंतर पुढील कामकाजास सुरुवात झाली.
शिवसंग्रामच्या आमदार भारती लव्हेकर यांनी बीड येथील स्त्रीभ्रूहण हत्यासंदर्भात प्रश्न विचारला होता. त्यावर उत्तर देताना बीड जिल्हा स्त्रीभ्रूण हत्येसाठी प्रसिद्ध आहे, असा उल्लेख केला. त्यावेळी विधानसभा अध्यक्षांनी बीड जिल्हा स्त्रीभ्रूण हत्येसाठी प्रसिद्ध आहे, असं विधान आमदार लव्हेकर यांनी केला. त्यानंतर आरोग्यमंत्र्यांनी त्याचा उल्लेख केला. त्यावर अजित पवार म्हणाले की, मंत्र्यांनी संबंधित सदस्यांना समाजवून सांगायला पाहिजे होते. मंत्र्यांकडून तसा उल्लेख म्हणजे संपूर्ण बीड जिल्ह्याचा अपमान आहे. त्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी तो शब्द कामकाज पटलावरून काढल्याचे स्पष्ट केले. या वेळी प्रकाश सोळंके यांनीही यासंदर्भात प्रश्न विचारला.
दरम्यान, गुलाबराव पाटील यांनी “मी मंत्री आहे”, असे म्हटले. यावरुन निलम गोऱ्हे आणखी संतापल्या आणि “मंत्री काय? मंत्री तुम्ही घरी, आधी खाली बसा. हे सभागृह आहे हे लक्षात घ्या. शांत राहा”, असे सुनावले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








