राज्यात युतीचं सरकार येऊन महिना उलटला तरी मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही. यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले आहे. दरम्यान राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनीही शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे. लोक आत्महत्या करण्यापर्यंत पावलं उचलत असून हे महाराष्ट्रासाठी भूषणावह नाही. पूरग्रस्त भागातील नागरिकांना मदत करा अशी मागणी त्यांनी केली आहे. अजित पवारांचा बारामतीमध्ये जनता दरबार पार पडला. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी राज्य सरकारला लक्ष्य केलं.
शिंदे सरकारवर निशाणा साधताना ते म्हणाले, कोणतंही सरकार आलं तरी काम करत असताना कायदा, संविधान, नियम यांच्या आधीन राहून काम केलं पाहिजे. राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार अद्याप प्रलंबित असल्याने विधासनभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नाराजी जाहीर केली आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यासाठी नेमकी कोणत्या गोष्टीची भीती आहे? अशी विचारणा अजित पवारांनी केली आहे.
हेही वाचा- राहुल शेवाळेंविरोधात तक्रार घेण्यास पोलिसांवर राजकीय दबाव ? महिला आयोगाचा आरोप
राज्यात पूरग्रस्त भागातील लोकांचं मोठं नुकसान झालं आहे. लोक आत्महत्या करण्यापर्यंत पावलं उचलत असून हे महाराष्ट्रासाठी भूषणावह नाही. यामुळे त्यांना तातडीने मदत केली पाहिजे. मनुष्यहानी झाली असून पाळीव प्राण्यांचीही मोठी हानी झाली आहे. घरांची पडझड, रस्त्यांची दुरावस्था झाली आहे यांना मदत करणे गरजेचे आहे असेही ते म्हणाले.
Previous Articleमिरजेत बिबट्याच्या कातड्याची तस्करी करताना एकजण ताब्यात
Next Article जाधवनगर येथे बिबट्याची दहशत








