Ajit Pawar : उत्पादन आणि मागणी यामध्ये तफावत झाली आहे. बार्शीतील कांदा उत्पादकाला केवल 2 रूपयांचा चेक दिला जातो. जगायचं कसं? असा प्रश्न कांदा उत्पादकांसमोर निर्माण झाला आहे. कांदा विकूनही शेतकऱ्यालाच पैसे भरण्याची वेळ आली, अशी अवस्था आहे.कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सरकारने वाऱ्यावर सोडले. कांदा निर्यात करण्याकरता ताबडतोब सोय करावी अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज केली. मविआच्या बैठकीनंतर अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला.
पुढे बोलताना ते म्हणाले की, बांग्लादेशसारख्या देशात कांदा निर्यात करणं गरजेचं आहे.शेतकऱ्याला कांद्याचा योग्य दर मिळणं गरजेचं आहे. कांदा निर्यातीबाबत सरकारनं विचार करणं गरजेचं आहे. लोकप्रतिनिधींच्या धमक्या येतायत, हल्ले होतायत, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर पाळत ठेवली जातेय. आव्हाडांच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी कशी काय दिली जाते? असा सवालही त्यांनी यावेळी केला.
कसबा पोटनिवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चार दिवस तेथेच ठाण मांडून बसले आहेत. त्यामुळे शेतकऱी आणि बाकिच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत आहे. निवडणुका आहेत मान्य, पण राज्याचा कारभार देखील बघा असा सल्ला देत हल्लाबोलही केला.
मनसेचा एकच आमदार तो जर दुसरीकडे गेला तर त्यांना चिन्ह देणार का? 40 आमदार दुसऱ्या बाजूला गेले म्हणून त्यांना चिन्ह कसं काय देणार? असा सवाल करत निवडणूक आयोगाच्या निकालावर अजित पवारांनी टीका केली. बंड केल्यापासून शिंदे यांच्याविरोधात जनभावना तीव्र आहेत.उद्योग बाहेर गेले, नवा एकही उद्योग राज्यात आणला नाही.मग ठाकरे गटाच्याच आमदारांविरोधात चौकशी कशी केली असाही सवालही त्यांनी केला.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









