Ajit Pawar : राज्यात भाजपचे सर्वात जास्त ताकदवान नेते देवेंद्र फडणवीस आहेत. कुणी कितीही गप्पा मारू द्या भाजपमध्ये फडणवीसच ताकदवान आहेत हे नाकारता येणार नाही. बारामतीत येऊन घड्याळ बंद करण्याचं करेक्ट कार्यक्रमच्या वल्गना करतात. मी जर मनात आणलं तर मी त्यांचाच करेक्ट कार्यक्रम करीन असा इशारा विरोधीपक्ष नेते अजित पावर यांनी भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांना दिला.
अनिल देशमुखांच्या सुटकेवर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, काहीच सिध्द होत नसताना तुरुंगात जाणं किती योग्य आहे. दोष नसताना तुरुंगात टाकता ही काय मोगलाई आहे का? असा सवाल अजित पवार यांनी विचारला.विदर्भातल्या जिल्हा बॅंका कुणी बंद पाडल्या?मविआनं काही दिलं नाही म्हणता मग तुम्ही काय केलं?
हेही वाचा- सीमाप्रश्नी कर्नाटक विरोधातील ठराव एकमताने मंजूर
मंत्रीपदासाठी गेल्या सहा महिन्यात एकही महिला आमदार मिळाली नाही हे दुर्देव आहे. आता अमृतावहिनींनाच सांगतो, मग बरोबर महिला मंत्री करतील, असा फडणवीसांचा चिमटा अजित पवारांनी काढला. करा दिल्लीला फोन आणि एकदाचा करून टाका मंत्रिमंडळ विस्तार.ज्याला मंत्रिपद द्यायचं आहे त्याला द्या पण विस्तार करा अशी मागणीही करत मंत्रिमंडळ विस्तारावरून शिंदे सरकारला टोला लगावला.कोल्हापुरच्या ढाण्यावाघाला एक मंत्रिपद देऊन गप्प बसवलं,चंद्रकांत पाटलांच्या मंत्रिपदावरून अजित पवारांनी चिमटा काढला.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








