प्रतिनिधी /वाळपई
होंडा येथील आजोबा कळसापेड देवस्थानच्या वर्धापन सोहळय़ाचा शुभारंभ सोमवार दिनांक 25 एप्रिल रोजी संध्याकाळी 7 वाजता व राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी देवस्थान समितीतर्फे त्यांचा सार्वजनिक स्तरावर सत्कार करण्यात येणार असून त्यानंतर गोमंतकीय सुपुत्र अजित कडकडे यांच्या सुरेल गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.
सदर कार्यक्रम हा सोहळय़ाचे प्रमुख आकर्षण असून यावेळी मोठय़ा प्रमाणात भाविक व स्वतः उपस्थित राहणार असल्याची माहिती देवस्थान समितीतर्फे देण्यात आलेली आहे.
अजित कडकडे यांचा पहिल्यांदाच याठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. त्यांना तबल्यावर राया कोरगावकर तर हार्मोनियम वादक म्हणून रोहीदास परब साथसंगत करणार आहेत.
यासंदर्भाची पूर्वतयारी पूर्ण झाली असून सोमवार पासून सुरू होणाऱया सोहळय़ात मोठय़ा प्रमाणात भाविक व नागरिक भाग घेण्यात येणार असल्याचे यावेळी समितीने स्पष्ट केले आहे.









