सीमा वादावर होऊ शकतो मोठा निर्णय
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारत आणि चीनदरम्यान सीमा वादावरून मागील काही दिवसांमध्ये नरमइा& दिसून आली आहे. देपसांग आणि डेमचोकच्या फ्रिक्शन पॉइंटवर डिसइंगेजमेंटनंतर दोन्ही देशांदरम्यान चर्चेचे सत्र पुन्हा सुरू झाले आहे. भारताचे सुरक्षा सल्लागार अजित डोवाल लवकरच चीनच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात ते चीनचे सुरक्षा सल्लागार तसेच विदेशमंत्री वांग यी यांच्याशी चर्चा करणार आहेत. डोवाल यांचा हा चीन दौरा 2-3 दिवसांचा असू शकतो.
डिसेंबरच्या अखेरीस किंवा जानेवारीच्या प्रारंभी डोवाल हे चीन दौऱ्यावर जाऊ शकतात. यादरम्यान ते विशेष प्रतिनिधी स्तरीय चर्चा करणार आहेत. डोवाल आणि् वांग यी यांच्यात रशियाच्या सेंट पीटर्सबर्गमध्ये 12 सप्टेंबर रोजी चर्चा झाली होती. यानंतरच डिसइंगेजमेंटवरून सहमती निर्माण होण्यास सुरुवात झाली होती आणि मग 21 ऑक्टोबर रोजी यावर अंतिम निर्णय होऊ शकला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्यात 23 ऑक्टोबर रोजी ब्रिक्स परिषदेरम्यान भेट झाली होती. यानंतर जी-20 परिषदेत रिओ डि जानेरोमध्ये चिनी विदेश मंत्री वांग यी आणि एस. जयशंकर यांच्यात चर्चा झाली होती. 20 नोव्हेंबर रोजी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे चीनच्या संरक्षण मंत्र्यांना भेटले होते. मोदी आणि जिनपिंग यांच्या भेटीदरम्यान पुढील चर्चेचे स्वरुप निश्चित करण्यात आले होते. दोन्ही देशांनी सीमा वादावर तोडगा काढण्यावरून सहमती दर्शविली आहे.
स्पेशल रिप्रेझेंटेटिव्ह मॅकेनिज्मची सुरुवा 2003 मध्येच करण्यात आली होती. याचा उद्देश सीमा वाद सोडविण्याची रणनीति तयार करणे होता. यानंतर 22 वेळा चर्चा झाली आहे. 2019 मध्ये या व्यवस्थेच्या अंतर्गत अखेरची चर्चा झाली होती. त्यानंतर 2020 मध्ये गलवान खोऱ्यात हिंसक झटापट होत भारताचे 20 सैनिक हुतात्मा झाले होते. तर अनेक चिनी सैनिकांनाही जीव गमवावा लागला होता. गलवान येथील घटनेनंतर दोन्ही देशांचे संबंध अत्यंत तणावपूर्ण झाले होते. नव्या चर्चेदरम्यान दोन्ही देशांदरम्यान बफर झोन निर्माण करण्यावरून बोलणी होऊ शकते. याचबरोबर कोर कमांडर स्तरीय चर्चेची भूमिका निश्चित केली जाऊ शकते.









