सातार्डा / प्रतिनिधी
Ajinkyatara Today at Satose – Part Two
सातोसे – दत्तवाडी येथील श्री दत्तात्रय कला, क्रीडा मंडळाच्यावतीने रविवार दि 2 एप्रिल रोजी रात्री 9 : 30 वाजता श्री दाडेश्वर रंगमंच येथे कै लोकराजा सुधीर कलिंगण प्रस्तुत नेरूर येथील श्री कलेश्वर दशावतार मंडळाचा ‘अजिंक्यतारा ‘ ( भाग 2 ) हा ट्रिकसीन युक्त पौराणिक नाट्यप्रयोग सादर केला जाणार आहे. त्यापूर्वी दुपारी 3 वाजता श्री सत्यनारायण महापूजा होणार आहे. लाभ घेण्याचे आवाहन श्री दत्तात्रय कला, क्रीडा मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.









