नवी दिल्ली
: नुकसानीत असलेल्या हवाई क्षेत्रातील कंपनी स्पाईसजेटला प्रवर्तक अजय सिंह यांचा सहारा मिळाला आहे. प्रवर्तक अजय सिंह यांनी कंपनीत 500 कोटी रुपयांची भर घातली असल्याची माहिती आहे. बुधवारी संचालक मंडळाची बैठक बोलावण्यात आली होती. सध्याच्या आर्थिक संकटाबाबत व कायदेशीर वादाबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीतच प्रवर्तक अजय सिंह यांनी मोठा निर्णय जाहीर केला. या नव्या गुंतवणुकीने स्पाइस जेटला दिलासा मिळाला आहे.









