वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
वरिष्ठ आयपीएस अधिकारी अजय भटनागर यांची केंद्रीय अन्वेषण ब्युरोमध्ये (सीबीआय) विशेष संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कार्मिक मंत्रालयाच्या आदेशानुसार त्यांची 20 नोव्हेंबर 2024 रोजी या सेवानिवृत्त होण्याच्या तारखेपर्यंत या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. भटनागर हे झारखंड केडरचे 1989 च्या बॅचचे भारतीय पोलीस सेवा अधिकारी असून सध्या फेडरल प्रोब एजन्सीमध्ये अतिरिक्त संचालक पदावर कार्यरत आहे. सीबीआयचे सहसंचालक अनुराग आता या संस्थेत अतिरिक्त संचालक पदाची धुरा सांभाळणार आहेत. तसेच गुजरात केडरचे 1994 बॅचचे आयपीएस अधिकारी मनोज शशिधर यांचीही तीन वर्षांच्या कालावधीसाठी सीबीआयमध्ये अतिरिक्त संचालक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.









