अजय देवगण मागील काही काळापासून बॉक्स ऑफिसवर एक हिट चित्रपट देण्याचा प्रयत्न करतोय. अजय देवगणने आता दिग्दर्शक लव रंजनसोबत त्याच्या एका हिट चित्रपटाचा सीक्वेल तयार करण्यासाठी हातमिळवणी केली आहे. अजयचा हा चित्रपट 2019 मध्ये प्रदर्शित ‘दे दे प्यार दे’चा चा सीक्वेल असणार आहे. या सीक्वेलद्वारे अजय देवगण आणि रकुल प्रीत सिंहची जोडी पुन्हा मोठ्या पडद्यावर दिसून येणार आहे. दे दे प्यार दे या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. अकीव अलीच्या दिग्दर्शनात तयार या चित्रपटाचा सीक्वेल निर्माण करण्याचा निर्णय आता निर्मात्यांनी घेतला आहे. लव रंजन यांनी ‘दे दे प्यार दे2’ चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी स्वत:च्या एका सहाय्यकाला सोपविली आहे. ‘दे दे प्यार दे’चे लेखक लव रंजन आणि तरुण जैन यांनी नव्या चित्रपटाची पटकथा तयार केली आहे. पूर्वीच्या चित्रपटात आशीष (अजय देवगण)च्या कुटुंबाला 26 वर्षीय आयशा खुराना (रकुल प्रीत सिंह)सोबतचे त्याचे नाते स्वीकारताना दाखविण्यात आले होते. तर नव्या चित्रपटात या नात्यावरील आयशाच्या कुटुंबाची प्रतिक्रिया दर्शविण्यात येणार आहे.









