ऑनलाईन टीम/तरुण भारत
आजरा : लातूर येथील एका तरुणास भारत बेंज ट्रकसह आजऱ्याजवळील जंगलक्षेत्रात बोलेरो गाडीतून आलेल्या चार तरुणांनी लुटले. यानंतर त्याला राप नावाच्या जंगलात हातपाय बांधून टाकण्यात आले. अशोक अर्जुन पोवार असे या तरुणाचे नाव आहे. ही घटना मध्यरात्री दोन वाजल्याच्या सुमारास आजरा आंबोली रस्त्यावरील जंगल क्षेत्रात घडली. काळोख्या जंगलात हात, पाय, तोंड बांधून टाकल्याने रात्रभर पावसात भिजल्याने अशोक भेदरला आहे.
दरम्यान, अशोक पवार या तरुणाला बोलेरो गाडीतून आलेल्या चार तरुणांनी कणकवलीच्या पुढे येऊन ट्रकच्या पुढे गाडी आडवी लावली. दरवाजा उघड नाहीतर काच फोडणार अशी धमकी दिल्यामुळे त्याने ट्रकचा दरवाजा उघडला. त्यानंतर गाडीतील दोन तरुण ट्रक मध्ये बसले. या तरुणांनी त्याला सावंतवाडी पर्यंत आणले. त्या ठिकाणी त्याच्या ताब्यातील ट्रक काढून घेऊन त्याला बोलेरो गाडीत घातले. तेथून ते आजऱ्याकडे आले. दरम्यान, आजरा येथे आले असता त्याला लुटून मारहाण केली.
हे ही वाचा : पत्नी नांदायला येत नसल्याच्या नैराश्यातून ‘तो’ चढला विजेच्या खांबावर









