मुंबई
बॉलीवुड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिनेता अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या अफवा कम चर्चा सर्वत्र सुरु असतानाच त्यात अजून एक भर पडली. दुबईत एका इव्हेंटमध्ये बॉलीवुड अभिनेत्री ऐश्वर्या रायचे नाव कार्यक्रमाच्या पडद्यावर ‘बच्चन’ आडनावाशिवाय प्रदर्शित झाले. त्यानंतर त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चेला पुन्हा उधाण फुटलं.
ग्लोबल आयकॉन, ऐश्वर्या दुबईतील ग्लोबल वुमेन्स फोरममध्ये सहभागी झाली होती. इव्हेंटमधील तिच्या व्हिडिओंचे व्हिडिओ सोशल मीडियावर आले, जिथे ती महिलांना प्रोत्साहन देताना, नवकल्पना आणि दृढनिश्चयाचे महत्त्व स्पष्ट करताना दिसली. दुबई महिला आस्थापनेच्या अधिकृत इंस्टाग्रामद्वारे व्हिडिओ शेअर केले गेले होते,









