Aishwarya Manjrekar selected for Delhi Forum’s Youth for Coast training
भारतात गेल्या काही वर्षांत पर्यावरणीय धोरणात कमालीचा बदल झाला आहे. ह्याचे प्रतिबिंब महासागर तसेच सागरी किनाऱ्या संदर्भातील नजीकच्या वर्षांत घेण्यात आलेल्या धोरणात किंवा प्रस्तावित असलेल्या धोरणात तसेच सरकारी कार्यक्रमांतही आढळते. म्हणून मच्छीमार तसेच मच्छीमारी संदर्भात काम करणाऱ्या समुदायांना या धोरणांची माहिती देणे तसेच त्यातून येऊ घातलेले बदल त्याचे विविध पातळीवर तसेच निसर्गावर होणारे परिणाम या संदर्भात जागरूकता निर्माण करणे गरजेचे झाले आहे.युथ फॉर कोस्ट मधील सहभागी व्यक्तींना जटिल सामाजिक-परिस्थितीकीय पाणी आणि जमीन माहिती आणि संसाधने याने सुसज्ज केले जाते.
या प्रशिक्षणासाठी प्रामुख्याने ९ (नऊ) सागरी किनाऱ्यावरील राज्यातील रहिवासी, महाराष्ट्र राज्यातील किंवा ज्यांना महाराष्ट्राशी संलग्न विषयावर काम करायचे आहे. अशा २२ ते ३५ वयोगटातील युवक व युवतींनी अर्ज केले होते. ज्या मधून २० जणांची निवड करण्यात आली. या मध्ये सिंधुदुर्ग जिल्हयातील मालवण तालुक्यातील ऐश्वर्य जनार्दन मांजरेकर या युवकाची सदर प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली आहे. सदर प्रशिक्षण २८ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर दरम्यान गोरेगाव मुंबई येथे पार पडणार आहे. सदर प्रशिक्षणासाठी निवड झाल्याबद्दल समस्त सिंधुदुर्गवासियांकडून ऐश्वर्य मांजरेकर यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले आहे .
मालवण / प्रतिनिधी