पोन्नियिन सेल्वन चित्रपटाचे पोस्टर
मणिरत्नम यांचा ‘पोन्नियिन सेल्वन’ चित्रपट हा बहुप्रतीक्षित चित्रपटांपैकी एक आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी बुधवारी ऐश्वर्या राय बच्चन हिने साकारलेल्या राणी नंदिनी या भूमिकेचा फर्स्ट लुक सादर केला आहे. ऐश्वर्याचे पहिले पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे. राणी नंदिनीच्या भूमिकेत ऐश्वर्या अत्यंत सुंदर दिसून येत आहे.

‘सूडाचा एक सुंदर चेहरा आहे, पझुवूरची राणी नंदिनीला भेटा’ असे पोस्टर शेअर करत निर्मात्यांनी म्हटले आहे. 30 सप्टेंबर रोजी हा चित्रपट तमिळ, हिंदी, तेलगू, मल्याळी आणि कन्नड भाषेत चित्रपटांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या पोस्टरने ऐश्वर्याच्या चाहत्यांना भुरळ घातली आहे. ‘पोन्नियिन सेल्वन’ चित्रपटाद्वारे ऐश्वर्या राय बच्चन चार वर्षांपेक्षा अधिक काळानंतर मोठय़ा पडद्यावर परतत आहे. या चित्रपटाबद्दल ऐश्वर्या अत्यंत उत्सुक आहे.
‘पोन्नियिन सेल्वन’ नावाच्या तमिळ कादंबरीवर हा चित्रपट बेतलेला आहे. चित्रपटात ऐश्वर्यासोबत चियान विक्रम, तृषा, जयम रवि, लाल, जयराम, पार्थिबन, कार्थी, प्रभू आणि प्रकाश राज हे कलाकार आहेत. चित्रपट दोन भागांमध्ये चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. पहिला भाग 30 सप्टेंबर रोजी झळकणार आहे.









