नवीन टर्मिनल बिल्डिंगची केली पाहणी
बेळगाव : सांबरा येथील बेळगाव विमानतळाच्या नवीन टर्मिनल बांधकामाची पाहणी करण्यासाठी मंगळवारी एअरपोर्ट अॅथॉरिटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष विपीन कुमार बेळगावमध्ये आले होते. बेळगाव विमानतळाची टर्मिनल बिल्डिंग ही विमानतळाचे वैशिष्ट्या ठरणार असल्याने उत्तम दर्जाचे बांधकाम करण्याची सूचना करण्यात आली. सध्याच्या टर्मिनलसोबतच नवीन टर्मिनल बांधकामाची त्यांनी माहिती दिली. तसेच विमानतळाची प्रवासी संख्या, उपलब्ध पार्किंगची व्यवस्था यासह इतर बाबींची त्यांनी माहिती घेतली. बेळगाव विमानतळामध्ये प्रवासी संख्या वाढविण्याची मोठी क्षमता असल्याने त्या दृष्टीने प्रयत्न करण्याची सूचना करण्यात आली. विमानतळाचे संचालक त्यागराजन यांनी बांधकामाच्या आराखड्याची माहिती दिली. त्याचबरोबर बांधकाम करणाऱ्या कंत्राटी कंपनीला विपीन कुमार यांनी सूचना केल्या. यावेळी विमानतळाचे अधिकारी उपस्थित होते.









