► वृत्तसंस्था / लंडन
ब्रिटनच्या नागरी विमानसेवा संपर्क यंत्रणेत मोठ्या प्रमाणात बिघाड निर्माण झाल्याने अनेक विमानांना विलंब लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ब्रिटीश एअरलाईन्स या विमानसेवा कंपनीने हे वृत्त दिले आहे. विमानवाहतूक नियंत्रण कक्षातील तांत्रिक बिघाडामुळे ही समस्या निर्माण झाल्याची माहिती आणखी एका विमानसेवा कंपनीने दिली. हा बिघाड दूर करण्यास काहीसा विलंब लागू शकतो. त्यामुळे अनेक विमाने विलंबाने उ•ाण करतील असे स्पष्ट करण्यात आले आहे. स्थानिक नियंत्रण यंत्रणेद्वारा काही विमाने आपला प्रवास करु शकतील. पण मोठ्या विमानांना विलंब निश्चित आहे, हे स्पष्ट करण्यात आले.