नवी दिल्ली :
एअर मार्शल साधना एस. नायर यांची आर्मी हॉस्पिटल सेवेच्या महासंचालक (डीजी) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नायर यांना एअर फोर्स टेनिंग कमांडच्या बेंगळूर मुख्यालयातून दिल्लीला पदोन्नतीने बदली देण्यात आली आहे. एअर मार्शल पदापर्यंत पोहोचणाऱ्या नायर या भारतीय हवाई दलाच्या दुसऱ्या महिला वैद्यकीय अधिकारी आहेत. 2002 मध्ये, भारतीय वायुसेना अधिकारी पद्मा बंडोपाध्याय एअर मार्शल पदापर्यंत पोहोचणाऱ्या पहिल्या महिला वैद्यकीय अधिकारी बनल्या होत्या.









