नवीन लोगो, डिझाईन जारी : डिसेंबर 2023 पासून सर्व विमानांवर झळकणार
वृत्तसंस्था /मुंबई
टाटा समूहाच्या मालकीच्या एअर इंडियाने गुऊवारी आपला नवीन लोगो आणि डिझाईनचे अनावरण केले. आपल्या लोगोचा भाग म्हणून, एअर इंडियाने लाल, पांढरा आणि जांभळा रंग कायम ठेवला. नवीन लोगोचे नाव ‘द व्हिस्टा’ असे असेल. एअरलाईनने त्यांचे नवीन टेल डिझाइन आणि थीम साँग देखील जारी केले आहे. एअर इंडियाच्या प्रवाशांना डिसेंबर 2023 पासून विमानांवर नवीन लोगो दिसेल. सध्या एअर इंडियाचे पहिले ए-350 विमान नवीन लोगोसह त्यांच्या ताफ्यात सामील झाले आहे. टाटा सन्सचे अध्यक्ष चंद्रशेखरन यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत एअर इंडियाने गुऊवारी संध्याकाळी थेट कार्यक्रमात आपल्या नवीन लोगोचे अनावरण केले. एअर इंडियाचा नवा लोगो हा एअरलाइनच्या नव्या ओळखीचा आणि रीब्रँडिंगचा भाग आहे. नवीन लोगो लॉन्च करताना टाटा सन्सचे चेअरमन एन चंद्रशेखरन यांनी ही सेवा म्हणजे व्यवसाय नसून एक राष्ट्रीय मिशन असल्याचे नमूद केले. एअर इंडियाला जागतिक दर्जाची विमान कंपनी बनवण्याचा प्रवास नुकताच सुरू झाला आहे. आज तुम्ही येथे पाहत असलेला नवीन लोगो ‘द व्हिस्टा’ने ऐतिहासिकदृष्ट्या अमर्याद शक्मयता, प्रगती आणि आत्मविश्वास यांचे प्रतिनिधित्व केले असल्याचे सांगितले. 15 महिन्यांच्या प्रवासात आम्हाला एअर इंडियाला सर्वोत्तम अनुभव, तंत्रज्ञान, ग्राहक सेवा आणि सुविधा देऊन जगातील सर्वोत्तम विमान कंपनी बनवायची आहे. गेल्या 12 महिन्यांत, आम्ही आमच्या सर्व आयामांमध्ये सुधारणा केल्याचेही त्यांनी नमूद केले. नवीन लोगो एअर इंडियाने वापरलेल्या क्लासिक आणि आयकॉनिक भारतीय विंडोपासून प्रेरित आहे. तो फ्युचरब्रँडच्या सहकार्याने तयार करण्यात आला आहे. एअरलाईनच्या मते, ते संधींच्या खिडकीचे प्रतीक आहे. नवीन ब्रँड जगभरातील पाहुण्यांना सेवा देणारी जागतिक दर्जाची एअरलाईन बनण्याची एअर इंडियाची महत्त्वाकांक्षा प्रतिबिंबित करते, असे एअर इंडियाचे सीईओ आणि एमडी पॅम्पबेल विल्सन यांनी सांगितले.









