मुंबई:
टाटा समुहाच्या अंतर्गत कार्यरत असणाऱ्या एअरइंडियाने विद्यार्थ्यांसाठी खास सवलतीची ऑफर जाहीर केली आहे. विद्यार्थ्यांना कंपनी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर विमान तिकीटावर 10 टक्क्यांपर्यंत सवलत देणार आहे.
या शिवाय विद्यार्थ्यांना 10 किलो ग्रॅमचे जादा वजनही नेता येण्याची सुविधा जाहीर केली आहे. एअरइंडियाची ही सुविधा इकॉनॉमी, प्रिमीयम इकॉनॉमी आणि बिझनेस केबीन या गटात तिकीट बुक करणाऱ्यांसाठी असणार आहे. देशांतर्गत विमान प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे वय 12 वर्षांपर्यंत असायला हवे. आंतरराष्ट्रीय विमान प्रवासासाठी सवलत घेण्यासाठी 12 ते 30 वर्षांच्या विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहे.









