चेन्नई
एअर इंडियाचे एक विमान सुदैवाने दुर्घटनाग्रस्त होण्यापासून वाचले आहे. कोलंबो-चेन्नई विमानाला मंगळवारी एक पक्षी धडकला. यामुळे एअर इंडियाला या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करवावे लागले आहे. विमानाचे सुरक्षित लँडिंग झाले आणि सर्व प्रवाशांना विमानातून सुरक्षितपणे उतरविण्यात आले. संबंधित विमानाची एअर इंडियाच्या इंजिनियर्सनी तपासणी केली. कंपनीने प्रवाशांकरता अन्य विमानाची व्यवस्था केली, जे अनंतर कोलंबोसाठी रवाना झाले.









