वृत्तसंस्था/ कोझिकोड
केरळच्या कोझिकोड येथून कतारची राजधानी दोहा येथे जात असलेल्या एअर इंडियाच्या विमानात उ•ाणनांतर तांत्रिक बिघाड झाला. वैमानिकाने हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाला या बिघाडाबद्दल त्वरित कळविले. यानंतर हे विमान परत केरळच्या कोझिकोड विमानतळावर सुरक्षितपणे लँड करविण्यात आले आहे.
बोइंग बी738 मॉडेलच्या विमानाला बुधवारी सकाळी 9.17 वाजता उ•ाण केल्यावर पुन्हा परतावे लागले आहे. विमानाला दोन तासांनी म्हणजेच 11.12 वाजता विमानतळावर सुरक्षितपणे उतरविण्यात आले. या विमानात वैमानिक आणि चालक दलाच्या सदस्यांसह एकूण 188 लोक होते. विमानाच्या केबिन एसीमध्ये काही तांत्रिक समस्या होती. हे इमर्जन्सी लँडिंग नव्हते असे विमानतळ प्रशासनाकडून सांगण्यात आले.
तांत्रिक बिघाडामुळे हे विमान कोझिकोड विमानतळावर परतले आहे. आम्ही प्राथमिकतेच्या आधारावर एक पर्यायी विमानाची व्यवस्था केली. तसेच विलंबादरम्यान प्रवाशांना आवश्यक सुविधा पुरविण्यात आल्याचे एअर इंडिया एक्स्प्रेसच्या प्रवक्त्याकडून सांगण्यात आले.
एअर इंडियाच्या अनेक विमानांमध्ये तांत्रिक बिघाडांमुळे अलिकडच्या काळात अनेक विमानो•ाणांना फटका बसला आहे. यात स्थानिक विमानो•ाणांसह विदेशी विमानो•ाणे देखील सामील आहेत. मंगळवारी दिल्ली विमानतळावर हाँगकाँग येथून दिल्लीत पोहोचलेल्या एअर इंडियाच्या विमानात लँडिंगनंतर आग लागली होती. सुदैवाने या दुर्घटनेपूर्वी सर्व प्रवासी आणि चालक दलाचे सदस्य विमानातून उतरले होते.









