ऑनलाईन टीम / तरुण भारत :
भारतीय वायुदलात अधिकारी पदावर महिला आहेत, परंतु एअरमन सैनिक रँकमध्ये महिलांचा अद्याप समावेश झाला नाही. आता पहिल्यांदाच वायुसेनेत महिला सैनिक रुजू होणार आहेत. पुढील वर्षी वायुदलात महिला अग्निवीरांची भरती करण्यात येणार असल्याची माहिती हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल व्ही आर चौधरी यांनी दिली.
चौधरी म्हणाले, भारतीय वायुदलात पुढील वर्षापासून महिला अग्निवीरांची भरती करण्यात येईल. ही भरती करण्यापूर्वी आम्हाला सर्व प्राथमिक व पायाभूत सुविधा तयार कराव्या लागतील. पुढील वर्षी हवाईदलात 3500 अग्निवीरांची भरती होईल. त्यामध्ये 3 टक्के जागा महिलांसाठी राखीव असतील. हळूहळू त्यात 10 टक्क्यांपर्यंत वाढ करण्याचे लक्ष्य आहे. त्याचा आढावा घेऊन पुढील भरतीसाठी महिलांची टक्केवारी निश्चित केली जाईल.
अधिक वाचा : परदेशी निधी प्रकरणात इम्रान खान यांच्या अटकेची शक्यता
वायुसेनेत भरती होणाऱ्या अग्निवीरांना सर्व प्रकारची कामे शिकवली जातील आणि त्या आधारे त्यांची चाचणी घेतली जाईल. चार वर्षे पूर्ण झाल्यावर, कायमस्वरूपी असणाऱ्यांपैकी जास्तीत जास्त 25 टक्के एअरमन बनतील, त्यांना ट्रेड दिला जाईल, असेही त्यांनी सांगितले.