500 किलोमीटर प्रतितास इतका कमाल वेग : 6 प्रकारची क्षेपणास्त्र वाहून नेण्यास सक्षम
वृत्तसंस्था/ बेंगळूर
हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेडने (एचएएल) बुधवारी वायुदलाला पहिले एलसीए तेजस ट्विन सीटर ट्रेनर विमान सोपविले आहे. हे एक कमी वजन असलेले विमान असून ते सर्व ऋतूंमध्ये उ•ाण करण्यास सक्षम आहे. भारतीय वायुदलाने एचएएलला 18 ट्विटन सीटर विमानांची ऑर्डर दिली आहे. यापैकी 8 विमाने पुढील वर्षांपर्यंत वायुदलाला प्राप्त होणार आहेत. उर्वरित 10 विमाने 2026-27 पर्यंत उपलब्ध होणार आहेत.
भारतीय सैन्याकडे एलसीए तेजसचा एक अत्याधुनिक वर्जन मार्क-1ए विमान देखील उपलब्ध आहे. हे एक लढाऊ विमान असून ते 500 किलोमीटर प्रतितासाच्या वेगाने उ•ाण करू शकते आणि 6 प्रकारच्या क्षेपणास्त्रांना वाहून नेण्यास सक्षम आहे.
30 जुलै रोजी वायुदलाने जम्मू-काश्मीरच्या अवंतिपोरा वायुतळावर तेजस एमके-1 तैनात केले आहे. या विमानाच्या उ•ाणाचा सरावर सध्या वैमानिक करत आहेत. काश्मीर हे क्षेत्र चीन-पाकिस्तान या शेजारी देशांशी असलेले संबंध पाहता अत्यंत संवेदनशील आहे. तेजस एमके-1 बहुउद्देशीय हलके लढाऊ विमान असून ते वायुदलाला काश्मीरच्या पर्वतीय क्षेत्रांवरून उ•ाण करण्याची क्षमता प्राप्त करून देणार आहे. भारतीय वायुदलाकडे सद्यकाळात 31 तेजस विमाने आहेत.
अन्य लढाऊ विमानांपेक्षा वेगळे
वायुदलाच्या ताफ्यात सध्या सुखोई-30 एमकेआय, राफेल, मिराज, मिग-29 आणि तेजस ही लढाऊ विमाने आहेत. यापैकी तेजस हे लढाऊ विमान भारतातच विकसित करण्यात आले असून यातील 50 टक्के सुटे भाग भारतातच तयार करण्यात आले आहेत. या विमानात अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या अंतर्गत इस्रायलची ईएल/एम-2052 रडार जोडण्यात आला आहे. यामुळे तेजस एकाचवेळी 10 लक्ष्यांना ट्रॅक करत त्यांच्यावर निशाणा साधण्यास सक्षम आहे. तसेच हे विमान केवळ 460 मीटर लांब धावपट्टीवरून टेकऑफ करण्याची क्षमता राखून आहे.









