जोधपूर / वृत्तसंस्था
भारतीय वायुदल आणि फ्रेंच वायू आणि अंतराळ दलाच्या गरुडा-7 या द्विपक्षीय हवाई सरावाचा जोधपूर हवाई तळावर समारोप झाला. या सरावामुळे दोन्ही देशांच्या हवाई दलांना परस्परांशी व्यावसायिक सुसंवाद साधण्याची तसेच परिचालनाबाबतच्या ज्ञानाची आणि अनुभवाची देवाण-घेवाण करण्याची संधी मिळाली. या सरावादरम्यान विविध टप्प्यांचे सूक्ष्म नियोजन आणि त्यानुसार अंमलबजावणी करताना दोन्ही दलांच्या जवानांना हवाई हल्ला आणि संबंधित मोहिमांचा प्रत्यक्ष अनुभव घेता आला. तसेच परस्परांशी सविस्तर संवाद साधून परस्परांच्या सर्वोत्कृष्ट कार्यपद्धतींबद्दल जाणून घेता आले. या सरावाने दोन्ही देशांच्या हवाई दलातील जवानांना सांस्कृतिक देवाण-घेवाण करण्यासाठी एक मंचही प्रदान केला.
प्रेंच वायू आणि अंतराळ दलाची राफेल लढाऊ विमाने आणि ए-330 मल्टी रोड टँकर ट्रान्सपोर्ट – एमआरटीटीवाहू विमाने तसेच भारतीय वायुदलाची एसयु-30 एमकेआय, राफेल, एलसीए तेजस आणि जॅग्वार ही लढाऊ विमाने या सरावात सहभागी झाली. भारतीय वायुदलाच्या इंधन भरणा करणाऱया एडब्ल्यूएसीएस आणि एईडब्ल्यू अँड सी सह एमआय 17 हेलिकॉप्टर आणि नव्याने समाविष्ट एलसीएस प्रचंड या हलक्मया हेलिकॉप्टरचासुद्धा या सरावात सहभाग होता.









