मुंबई, पुणे, बेंगळूर मार्गांवर अतिरिक्त बस : रात्रीच्या प्रवासासाठी बससेवा
प्रतिनिधी / बेळगाव
प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी विविध मार्गांवर अतिरिक्त वातानुकूलित बस धावत आहेत. परिवहनने लांब पल्ल्यासाठी वातानुकूलित (एसी), आराम बस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनामुळे मागील दोन वर्षात सण-उत्सवांसाठी धावणारी बससेवा थांबली होती. मात्र, यंदा सण-उत्सव मोठय़ा उत्साहात पूर्ववत सुरू झाले आहेत. त्यामुळे ये-जा करणाऱया प्रवाशांची संख्या वाढली आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी परिवहनच्या वातानुकूलित आरास बस सुसाट धावताना दिसत आहेत.
मध्यवर्ती बसस्थानकातून बेंगळूर, मंगळूर, म्हैसूर, नाशिक, हैद्राबाद, चेन्नई, तिरुपती, मुंबई, पुणे आदी शहरांकडे जादा बस धावणार आहेत. मागील दोन वर्षात परिवहनला प्रचंड प्रमाणात फटका बसला आहे. त्यामुळे परिवहनची आर्थिक घडी विस्कटली आहे. त्यामुळे परिवहन उत्पन्न वाढीसाठी कसोशीने प्रयत्न करत आहे. विविध मार्गांवर बस सोडून महसूल वाढविण्यासाठी परिवहनची धडपड सुरू आहे. शुक्रवार दि. 21 ते सोमवार दि. 31 ऑक्टोबर या काळात ही बससेवा धावणार आहे. येत्या शुक्रवारपासून 6 दिवस सलग सुटी असल्याने या काळात लांब पल्ल्याहून मूळ गावी परतणाऱयांची संख्या अधिक असते. यासाठी रात्रीच्या प्रवासासाठी आराम बससेवा पुरविण्यात आली आहे.
मुंबई, पुणे, पणजी, बेंगळूर, नाशिक, मंगळूर, हैद्राबाद आणि गोवा आदी भागातून येणाऱया प्रवाशांसाठी वातानुकूलित आराम बससेवा सुरू केली आहे. प्रवासी www.क्srtम्.क्arहूक्a.gदन्.ग्ह या वेबसाईटवर किंवा क्srtम् स्दंग्त aज्ज्या ऍपवर ऑनलाईन बुकिंग करू शकतात.









