खाली पडल्याने मोडणार नाही हाडं
एका वयानंतर माणसाची हाडं कमकुवत हेऊ लागतात. तसेच माणसाला स्वत:च्या शरीरावरील नियंत्रण राखता येत नाही. यामुळे अनेकदा वृद्ध लोक खाली पडतात आणि यामुळे त्यांची कमकुवत हाडं मोडतात. वृद्धत्वात मोडलेली हाडं पुन्हा जोडली जाण्यास मोठा कालावधी लागतो. अनेकदा ही हाडं जोडली न गेल्याने वृद्धाला व्हिलचेअरवरच रहावे लागते. परंतु चीनमधील एका कंपनीने वृद्धांसाठी मोठी सुविधा निर्माण केली आहे.
तुम्ही आजपर्यंत कारमधील एअर बॅग्स पाहिले असतील. हे एअर बॅग्स दुर्घटनेवेळी कारच्या सीटसमोर आपोआप खुले होतात. यामळे दुर्घटनेत गंभीर जखमी होण्याची शक्यता दुरावते. चीनने हेच तंत्रज्ञान माणसांसाठी तयार केले आहे. एका चिनी कंपनीने वृद्धांसाठी एअर बॅग्ज तयार पेले आहेत. हे एअर बॅग्ज परिधान केल्यावर एखादा वृद्ध खाली कोसळल्यावर तो जखमी होणार नाही तसेच त्याची हाडं मोडणार नाहीत.
चिनी कंपनी सुझोऊ यिडाईबो इंटेलिजेंट टेक्नॉलॉजीने माणसांसाठी विशेषकरून वृद्धांसाठी या एअरबॅगची निर्मिती केली आहे. कारच्या एअरबॅगप्रमाणेच ही काम करणार आहे. यामुळे वृद्धांना सुरक्षा मिळणार आहे. ज्याप्रकारे कारमधील एअर बॅग दुर्घटनेळी खुले होतात, त्याचप्रमाणे माणसांसाठी तयार केलेले हे एअर बॅग देखील ते खाली पडण्यापूर्वीच खुले होणारआहेत. यामुळे पडल्यानंतरही वृद्धांना जखम होणार नाही.
वृद्धांना बेल्टसदृश हे एअरबॅग्ज परिधान केले जाऊ शकतात. या बेल्टमध्ये एक छोटेसे उपकरण असून याचे नाव मायक्रो गयरोस्कोप आहे. कुणी खाली पडू लागताच या उपकरणाद्वारे एअरबॅग खुले केले जातात. चीनमध्ये निम्म्याहून अधिक लोकसंख्या वृद्धांची असल्याने तेथे या एअरबॅगची मोठी गरज निर्माण झाली होती.









