बेळगाव प्रतिनिधी – ऐन दिवाळीमध्ये खंडग्रास सूर्यग्रहण आले आहे. सोमवारी नरक चतुर्दशी झाली आणि मंगळवारी खंडग्रास सूर्यग्रहण आले. मंगळवारी बेळगावची बाजारपेठ पूर्णपणे खुली असते. शिवाय दिवाळीमध्ये तर सुट्टी रद्द करून व्यापारी विक्रेते दुकानदार आपले व्यवसाय सुरू ठेवतात. कोरोनाच्या कारणास्तव गेले दोन वर्षे सार्वजनिक स्वरूपात उत्सव करण्यावर निर्बंध आले होते. पण आता दिवाळीचा उत्साह ओसंडून वाहत असतानाच सूर्य ग्रहणामुळे उत्साहाला खंड पडला आहे ग्रहणात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. खरेदी केली जात नाही या कारणामुळेच मंगळवारी बेळगावची बाजारपेठ मोकळी झाली आहे. सायंकाळी सहा नंतर ग्रहण काल संपल्यानंतर दुकाने आणि अन्य व्यवहार सुरू होण्याची शक्यता आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









