वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
चिनी टेक कंपनी आयकू यानी आयकू निओ 7 प्रो 5 जी हा स्मार्टफोन भारतात सादर केला आहे. यामध्ये कंपनीने दावा केला आहे की सदरचा फोन हा 5000 एमएएच क्षमतेचा असणार आहे.
कंपनीने सादरीकरणावेळी सांगितले आहे, की गेमिंगच्या फोनमध्ये चांगल्या परफॉर्मन्साठी स्वतंत्र गेमिंग चिप दिली आहे. यामध्ये कंपनीने 8 जीबी रॅमसह 128 जीबी स्टोरेज दिले आहे. या मॉडेलची किंमत ही 34,999 रुपये तर यावरील मॉडेलची किंमत ही 37,999 इतकी राहणार असल्याची माहिती आहे.
फोन विषयी…
?डिस्प्ले 7 प्रो 5 जी मध्ये 120 एचझेड रिफ्रेश रेटसह 6.78 इंच पूर्ण एचडी डिस्प्ले
?हार्डवेअरसह सॉफ्टवेअर : फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॉन 8 प्लस जेन 1 प्रोसेसर
?कॅमेरा : फोटोग्राफीसाठी मोबाईलमध्ये 50 एमपी, 8 एमपी 2 एपीचा ट्रिपल पॅमेऱ्याचा सेटअप मिळणार आहे.









