तामिळनाडूतील मित्रपक्षाचा भाजपला धक्का
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशभर समान नागरी कायद्यासाठी जोरदार चर्चा सुरू असतानाच तामिळनाडूतील प्रमुख मित्रपक्ष अण्णाद्रमुकने भाजपला धक्का दिला आहे. समान नागरी संहितेसाठी घटनेत कोणतीही दुऊस्ती न करण्याची विनंती त्यांनी केंद्र सरकारला केली आहे. या कायद्यामुळे भारतातील अल्पसंख्याकांच्या धार्मिक अधिकारांवर विपरीत परिणाम होईल, असा ‘एआयएडीएमके’चा दावा आहे. नॅशनल पीपल्स पार्टीनंतर समान नागरी कायद्याला विरोध करणारा अण्णाद्रमुक हा भाजपचा दुसरा मोठा सहयोगी पक्ष आहे. आता भाजप आपल्या प्रमुख मित्रपक्षांना या कायद्याचे महत्त्व कसे पटवून देतो हे पाहावे लागेल. यापूर्वी, नागालँडमधील भाजपचा मित्र राष्ट्रवादी लोकशाही पुरोगामी पक्षाने समान नागरी संहिता लागू करण्यावर आक्षेप व्यक्त केला होता.









