आर्टिफिशियल इंटेलिजेन्स मोठे बदल घडवून आणत असून याचे नवे उदाहरण अमेरिकेत दिसून आले आहे. येथील कर्टनी यांच्या 4 वर्षीय मुलाला अजब आजार झाला होता आणि तो वेदनेने तडफडत होता. सर्वप्रकारच्या गोष्टी तोंडात घेत चावण्याचा प्रयत्न करायचा, त्याची उंची वाढणे थांबले होते. तसेच शरीराच्या दोन्ही बाजूंमध्ये असंतुलन दिसून येत होते.
3 वर्षांपर्यंत वेगवेगवेगळ्या वेळी 17 डॉक्टरांना दाखविले, परंतु कुणालाच आजाराचे अचूक निदान करता आले नाही. अखेर कर्टनी यांनी मुलाच्या उपचारासाठी एआय टूल चॅटजीपीटीची मदत घेतली. त्यांनी मुलाच्या एमआरआर नोट्सना क्रमानुसार चॅटजीपीटीमध्ये प्लग गेले, चॅटजीपीटीने एलेक्स पालथा बसू शकत नसल्याचा निष्कर्ष काढला. यामुळे संरचनात्मक हिस्स्यात समस्या असून तो न्यूरोलॉजिकल सिंड्रोम ‘टेथर्ड कॉर्ड’ने ग्रस्त असल्याचे चॅटजीपीटीकडून कळले. यानंतर कर्टनी यांनी अन्य न्यूरोसर्जनसमोर
चॅटजीपीटीकडून प्राप्त निष्कर्ष मांडला.

चॅटजीपीटीने काढलेला निष्कर्ष अचूक असल्याचे डॉक्टरांना आढळून आले. याप्रकरणी डॉक्र एमआरआर नोट्सद्वारे एलेक्सच्या कण्यामध्ये समस्या कुठे आहे हे शोधून काढण्यास समर्थ होते. परंतु त्यांना ते जमले नव्हते. एलेक्सच्या कण्याच्या हाडावर शस्त्रक्रिया झाली असून आता त्याची प्रकृती सुधारत आहे.
ब्रिटनच्या नॅशनल इन्स्टीट्यूट फॉर हेल्थ अँड केयर रिसर्च (एनआयएचआर)नुसार एआयने आजारांचे स्क्रीनिंग आणि उपचार दोन्ही सोपे केले आहेत. एआयद्वारे रुग्णालयांना किती बेड्सची गरज आहे हे योग्यवेळी कळू शकते. एआयद्वारे ब्रेस्ट स्क्रीनिंगमुळे रेडिओलॉजिस्टचे काम निम्मे झाले आहे. सध्या एआयच्या माध्यमातून वैद्यकीयच्या 5 क्षेत्रांमध्ये प्रभावी काम होतेय.
एआयवर भरवसा दाखविण्याची वेळ आली आहे. डोळ्यांमध्ये होणाऱ्या संभाव्य आजारांचाही एआयद्वारे शोध लावला जात आहे. 2500 जणांच्या डोळ्यांच्या तपासणीत एआयने 6 पैकी 5 मध्ये अचूक निदान केल्याचे समोर आले आहे. सर्वसाधारणपणे हृदयविकाराच्या धक्क्याचे निदान रुग्णालयात पोहोचल्यावरच होऊ शकते, परंतु एआय आधारित स्मार्ट स्टेथोस्कोपद्वारे घरातच प्राथमिक टप्प्यात हृदयविकाराच्या धक्क्याचे निदान होऊ शकणार आहे. नियमित रक्त तपासणीद्वारे एआय अॅप्लिकेशनच्या माध्यमातून कुठल्या व्यक्तीला हृदयविकाराचा धक्का बसला होता हे कळणार आहे.
कुठल्या रुग्णाला कोणते औषध

एआयद्वारे कर्करोगाचे निदानही लवकर होत आहे. एआय सिटी स्कॅनद्वारेच पेशींची ग्रोथ मॅप करता येते. पेशींच्या अनियमित वृद्धीमुळे कर्करोगाबद्दल त्वरित कळते. कर्करोगाच्या पेशी नष्ट करण्यासाठी कुठल्या रुग्णाला कोणते औषध द्यावे हे एआयद्वारे डॉक्टरही माहिती करून घेऊ शकतात.









