चौंडी प्रतिनिधी
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थळ असलेल्या अहमदनगर जिल्ह्यतील चौंडी येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त उपस्थित आहेत. त्याचवेळी भाजपचे नेते आ. गोपिचंद पडळकर यांनी आपल्या कार्यकर्त्यासह पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्मस्थळाचे दर्शन घेण्याचा आग्रह केल्याने चौंडी येथे वातावरण चांगलेच तापले आहे.
अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थळ असलेल्या अहमदनगरमधील चौंडी येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा अहमदनगर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातर्फे जाहीर सत्कार होणार आहे. या कार्यक्रमाला भाजप आमदार गोपिचंद पडळकर यांनी विरोध केला असून जन्मस्थळाचे दर्शन घेण्यासाठी पोलिसांनी अडवल्याने त्यांनी याचा निषेध केला. यावेळी बोलताना ते म्हणाले “हे सरकार पोलिसांच्या आडून राजकारण करत असून मला आणि माझ्या कार्यकर्त्यांना अहिल्यादेवीं जन्मस्थळाचे दर्शन घेण्यापासून कोणीही अडवू शकत नाही.”