वाठार किरोली : शेतीचा विकास झाला, शेतकऱ्याचा विकास झाला तरच देशाची आर्थिक प्रगती होणार आहे, असे प्रतिपादन सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी रुपेश जयवंशी यांनी केले.
धामणेर तालुका कोरेगाव येथे सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व यशवंत किसान विकास परिषद सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या ऊस विकास चर्चासत्र व शिवार फेरी या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर तहसीलदार अमोल कदम, आय. सी. ए. आर. शुगरकेन चे डायरेक्टर डॉ. बक्षीराम यादव, ऊस विकास तज्ञ डॉक्टर भरत रासकर, डॉ. धर्मेंद्र कुमार फाळके, डॉ. राजेंद्र सरकाळे, मॅनेजिंग डायरेक्टर किरण कुमार, खटाव मान शुगर लिमिटेडचे एमडी संग्राम घोरपडे, राज्य लेखा समितीचे माजी अध्यक्ष शहाजीराव क्षीरसागर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले शेतीचा विकासासाठी शासन पातळीवर सातत्याने प्रयत्न केले जात असतात. कारण शेती हा भारताच्या अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा आहे. आपल्या परिसरात ऊस शेती शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीचे साधन ठरले आहे. धामणेर येथील प्रगतिशील शेतकरी सौरभ यांच्या कोकीळ यांच्या शिवार फेरीतून प्रगतिशील शेतकरी शेती कशी करावी याचे मार्गदर्शन इतर शेतकऱ्यांनीही घ्यावे.
राज्यराज्य लेखा समितीचे माजी अध्यक्ष शहाजीराव क्षीरसागर म्हणाले, या परिसरात एकरी 100 टन ऊस उत्पादन घेणारे अनेक शेतकरी आहेत. ऊस शेतीच्या माध्यमातून अनेकांची आर्थिक प्रगती झालेली आहे. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शेतकऱ्यांची आर्थिक मदत देण्यात अग्रेसर आहे. अनेक योजना या बॅकेच्या माध्यमातून राबवल्या जात आहेत.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी केले यावेळी त्यांनी जिल्हा बँकेने शेतीच्या विविध प्रगतीसाठी केलेल्या विविध योजनांची माहिती उपस्थित शेतकऱ्यांना दिली.
यावेळी धामणेर व परिसरातील शेतकरी कार्यक्रमासाठी उपस्थित होते प्रारंभी सर्व मान्यवरांनी सौरभ कोकीळ यांच्या शेतीत ऊसातील केलेल्या विविध प्रयोगांची माहिती घेतली. आभार सौरभ कोकीळ यांनी मानले.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









