कसबा बीड / विश्वनाथ मोरे :
कोल्हापूर पश्चिम भाग राजर्षी शाहू महाराज यांच्या दूरदृष्टीपणामुळे राधानगरी तलावाची निर्मिती झाली व हा संपूर्ण भाग सुजलाम तुफलाम झाला. हळूहळू शेतकरी शेती व्यवसायाकडे एक प्रमुख व्यवसाय म्हणून पाहू लागला. त्यास जोड म्हणून साखर कारखान्याची निर्मिती झाली. पण सरकारचे अस्थिर धोरण, शेतीमाला योग्य तो हमीभाव नाही, शेतीसाठी लागणाऱ्या खतांचा व बी बियाणांचा गगनाला भेटलेला दर, शेतकऱ्याच्या हक्काच्या मालास हमीभावच नाही. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे.
त्यातून मार्ग काढण्यासाठी पशुपालन व्यवसाय शेतीला पूरक म्हणून केला जातो. सुरुवातीला दूध संघाच्या माध्यमातून सर्व • शेतकरी वर्गाला चांगल्या योजना मिळाल्या. त्यामध्ये पशुसंवर्धन, दूध उत्पादन वाढ करणे, नवीन म्हैस व गाय खरेदी करण्यासाठी सबसिडीची सुरुवात, अशा अनेक योजनांच्या माध्यमातून शेतकरी उत्साहाने पशुपालन व्यवसाय करू लागला. पण दिवसेंदिवस शासन स्तरावरून व संघाच्या माध्यमातून नवनवीन नियम सुरू होऊन आता दूधउत्पादकाला गृहीत धरले जाऊ लागले आहे. प्रत्येक महिन्याला किंवा दोन महिन्याला दराची घसरण ही ठरलेलीच आहे.
एका महिन्यात दर वाढवून द्यायचे व लगेच दुसऱ्या महिन्यात पशुखाद्याची किंमत वाढवायची. म्हणजेच एका हाताने द्यायचे दुसऱ्या हाताने घ्यायचे… अशा विविध पशुपालनामधील समस्या संपता संपेनां अशी व्यथा शेतकऱ्याची आहे.
दराचे योग्य नियोजन व्हावे
दूध संघाच्या मार्फत वासरू बाल संगोपन, नवीन म्हशी विकत घेण्यासाठी राबविण्यात येण्प्रया योजना, गोट्यापर्यंत डॉ क्टरांची वैद्यकीय सुविधा, गाव तिथे डेअरी अशी राबवण्यात आलेली संकल्पना या सर्व बाबींचा विचार केला तर दूध संघांनी शेतकऱ्यांच्या दारापर्यंत सोयी सुविधा दिल्या आहेत. त्याचबरोबर दराचे सुद्धा योग्य नियोजन व्हावे त्यामध्येच चढउतार नसावा. जेणेकरून दूध डेअरी व दूध संघास सभासदांना आणखीन चांगल्या सुविधा देता येतील.
ग्रामीण दूध डेअरी संचालक मंडळ








