कोल्हापूर :
यंदा जिल्हात पुरेपूर पाऊस झाला असून खरीप हंगाम तोंडावर आला आहे. शेतकऱ्यांची पेरणीची धावपल सुरु झाली आहे. या पार्श्वभूमीवर बनवाट बियाणांचा प्रश्न गंभीर बनला आहे. शेतकऱ्यांची फसवणूक रोखण्यासाठी तालुका कृषी विभागाने विशेष दक्षता घेतली आहे. बनावट बियाणे विक्रेत्यांविरोधात कारवाई करण्यासाठी पथके तयार करण्यात आली आहे. सर्व परवानाधारक दुकानदारांना नियमांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
शिरोळ तालुक्यातील 167 बियाणे विक्रेत्यांची नुकतीच बैठक घेऊन कृषी विभागाने संभाव्य कारवाईचा इशारा दिला. पावसाचे आगमन झाल्यानंतर पेरण्यांची लगबग सुरु होते. आणि त्याचबरोबर बनावट बी – बीयाणे विक्री करणारे सक्रिय होतात. खरीप हंगामात बनावट बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारले जाऊ नये यासाठी प्रशासनाने विक्रत्यांवर करडी नजर ठेवली आहे.
दरवर्षी शेतकरी लाखो रुपयांची बियाणे खरेदी करतात. त्याचा गैरफायदा घेत काही कंपन्या बनावट बियाणे विक्री करुन शेतकऱ्यांची फसवणूक करत असल्याचे यापूर्वी उघड झाले आहे. बनावट बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचे नुकसानस सामोरे जावे लागते. बियाने बनावट निघाले की शेतकऱ्यांची ऐन हंगामात धावपळ सुरु होते. बियाणांची उगवन क्षमता नसल्याने त्यांची तक्रार करण्यास वेळ लागतो. त्यामुळे कंपनीकडून कोणतीही भरपाई मिळत नाही. आणि शेतात पीक ही उगवत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना मानसीक त्रासासोबत आर्थिक त्रास ही सहन करावा लागतो.
- शेतकऱ्यांनी काय करावे
बियाणे साधारणत: चार ते पाच दिवसांत उगवतात यासाठी शेतकऱ्यांनी पीकाच्या अवस्थेचे निरीक्षण करावे.
बियाणे खरेदी करताना दुकानदाराकडून पावती घ्यावी
पेरणी नंतर उगवण कमी आढळल्यास तालुका कृषी अधिकारी कार्यालय किंवा कृषी अधिकारी पंचायत समिती यांच्याकडे नमुन्यांची तपासणी करण्यास तक्रार करावी.








