सावंतवाडी
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ ,दापोली मान्यताप्राप्त सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान किर्लोस संचलित छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालय किर्लोस ओरोस या महाविद्यालयातील कृषीदूतांनी केसरी या गावात येऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. नैसर्गिक शेतीसह शेती विषयक मार्गदर्शन या कृषीदूतांनी करत काही प्रयोगही सादर केले. यावेळी केसरीच्या सरपंच स्नेहल कासले, उपसरपंच संदीप पाटील, ग्रामपंचायत सदस्य गुरुनाथ कासले, कृष्णा सावंत, कृषी सेवक प्रदीप सावंत, सुनील जाधव, केंद्रचालक श्रावणी नाईक , आदी उपस्थित होते.कृषी महाविद्यालय ओरोसचे प्राचार्य योगेश पेडणेकर, कार्यक्रमाधिकारी प्रसाद ओगले, प्रा गोपाल गायकी, प्रा महेश परुळेकर, प्रा .सुयश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी दूत आलोक दळी, वासुदेव राऊळ, हणमंत खेड, हर्षल राणे , सिद्धार्थ उलागड्डे, देवनारायण. एस, तनिष्क. एस आदींनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. कृषी शिक्षणाच्या माध्यमातून या कृषी दुतांनी येथील शेतकऱ्यांना शेती तंत्रज्ञानाचा प्रसार , शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती, बीज प्रक्रिया, चारा, पिके, पारंपरिक नैसर्गिक शेतीचा अभ्यास , वृक्ष लागवड, आदी कृषी विषयक कार्यशाळा घेऊन मार्गदर्शन केले.