मालमत्ता खरेदीसंदर्भात साधारणपणे 5,000 कोटी रुपयांचा करार पूर्ण
नवी दिल्ली :
जागतिक गुंतवणूक फर्म ब्रुकफिल्ड आणि भारती एंटरप्रायझेसने चार व्यावसायिक मालमत्तांचा खरेदीचा व्यवहार पूर्ण झाल्याचे म्हटले आहे.
या व्यावसायिक मालमत्तांमध्ये दिल्ली एरोसिटी आणि वर्ल्डमार्कच्या गुरुग्राममधील 5,000 कोटी रुपयांच्या मालमत्तांचा समावेश आहे. इतर मालमत्तांमध्ये एअरटेल सेंटर आणि पॅव्हेलियन मॉलचा समावेश आहे. भारती एंटरप्रायझेस आणि ब्रुकफिल्ड अॅसेट मॅनेजमेंट यांनी दिल्ली-एनसीआरमधील 33 लाख चौरस फूट उच्च दर्जाच्या व्यावसायिक मालमत्तेसाठी त्यांचा संयुक्त उपक्रम यशस्वीपणे पूर्ण केल्याची घोषणा केली.
भारती एंटरप्रायझेसने एका निवेदनात म्हटले आहे की, ‘या करारांतर्गत, ब्रुकफिल्डद्वारे व्यवस्थापित केलेला रिअल इस्टेट फंड आता या संयुक्त उपक्रमात 51 टक्के हिस्सा विकत घेण्यास सक्षम आहे, तर भारती एंटरप्रायझेसने 49 टक्के हिस्सा राखून ठेवला आहे. या कराराचे मूल्य सुमारे 5,000 कोटी रुपये आहे.’
भारती रियल्टीने 50 लाख चौरस फुटांहून अधिक मालमत्ता विकसित केल्या आहेत. भारती रिअॅल्टी सध्या दिल्ली एनसीआरमध्ये 1 कोटी चौरस फुटांहून अधिक किरकोळ आणि मिश्र वापराच्या रिअल इस्टेटचा विकास करत आहे.
विकासावर लक्ष केंद्रित करेल
भारती एंटरप्रायझेसचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक हरजित कोहली म्हणाले, ‘उत्तर भारतातील आमच्या प्रमुख मालमत्तेसाठी ब्रुकफिल्डशी केलेला करार आमच्यासाठी एक मोठे यश आहे कारण यामुळे रिअल इस्टेट क्षेत्रातील सखोल अनुभव असलेल्या जागतिक पायाभूत गुंतवणूकदारासोबत भागीदारी झाली असल्याचेही ते म्हणाले आहेत.









