बेळगाव : मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेट सेंटर बेळगाव येथे अग्निवीर भरती रॅली 25 जूनपासून सुरू होणार आहे. 25 ते 1 जुलैपर्यंत शारीरिक चाचणी होईल. त्याचा तपशील पुढीलप्रमाणे.
- दि. 25 जून-स्क्रिनिंग ऑफ आऊटस्टॅडिंग स्पोर्टस्मन, अग्नीवीर जनरल ड्यूटी, ऑल इंडिया ऑल कास्ट
- दि. 26-अग्निवीर जनरल ड्यूटी चाचणी-अहमदनगर, अकोला, अमरावती, छ. संभाजी नगर (औरंगाबाद), बीड, भंडारा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, मुंबई शहर व मुंबई सबअर्बन.
- दि. 27-नागपूर, नांदेड, नंदूरबार, नाशिक, धाराशीव, पालघर, परभणी, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशीम.
- दि. 28-मध्य प्रदेश, छत्तीसगड, गुजरात, गोवा, कर्नाटक, आंध्रप्रदेश.
- दि. 30 जून-स्क्रिनिंग ऑफ अग्निवीर ट्रेंडसमन (वॉर्डस् ऑफ सर्व्हिस, अँड एक्स सर्व्हिसमन.
- दि. 1 जुलै-स्क्रिनिंग ऑफ अग्निवीर क्लार्क, स्टोअरकिपर, टेक्निकल, फक्त वॉर्डस ऑफ सर्व्हिंस आणि एक्स सर्व्हिसमन, -जे. मराठा लाईट इंन्फट्रीशी सलग्न आहेत.
- दि. 10 सप्टेंबर -सर्व अग्नीवीर उमेदवारांची लेखी परीक्षा. अग्निवीर जीडीसाठी दहावी उत्तीर्ण, किमान 45 टक्के गुण, तसेच वाहन परवाना असल्यास प्राधान्य अग्निवीर क्लार्क व स्टोअर किपर पीयूसी उत्तीर्ण, किमान 60 टक्के गुण
संपर्क साधण्याचे आवाहन
अग्निवीर ट्रेंडस्मनसाठी दहावी उत्तीर्ण तसेच अन्य वर्गवारीतील अग्निवीर टेंडसमनसाठी आठवी पास. य् ााशिवाय खेळाडूंसाठी विशेष सुविधा देण्यात येणार आहेत. इच्छुक अग्निवीर व खेळाडूंनी अधिक माहितीसाठी www.joinindianarmy.nic.inसंकेतस्थळावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.









