फोंडा-मडगाव मार्गावरील वाहतूक रखडली : जिवितहानी टळली, कोट्यावधी रूपयांच्या मालमत्तेची हानी,दुपारपासून उशिरा रात्रीपर्यत धुमसतात आगीचे लोळ

फोंडा : फोंडा-मडगाव महामार्गावर ढवळी येथे एका भंगार अड्ड्याला अचानक आग लागून कोट्यावधी रूपयांच्या मालमत्तेची हानी झाली. पोलीस व सर्व सरकारी यंत्रणा फोंडा पालिका निवडणुकीत व्यस्त असताना काल शुक्रवारी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. काही क्षणात रौद्ररूप धारण करीत सुरू झालेल्या या अग्नितांडवामुळे दुपारपासून फोंडा ते मडगाव हा महामार्ग वाहतुकीसाठी बंद करावा लागला. त्यामुळे मडगावहून फोंडामार्गे होणारी वाहतूक साकवार बोरीहून अडूशे-वाडी-तळावलीमार्गे वळविण्यात आली होती. तसेच दुसऱ्या बाजूने बोरी-बेतोडा बगलरस्तावरून वाहने वळविण्यात आली होती. फोंडा शहर व कवळे भागात लागलेली ही सर्वात मोठी आगीची घटना असल्याचा दावा फोंडा अग्निशामक दलाने केलेला आहे. भंगार अ•dयातील रसायनयुक्त बॅरल्स, प्लास्टिक, रबरचे साहित्य, लाकूड आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्यामुळे काळेकुट्ट धुराचे व आगीचे लोळ हवेत पसरले होते. आगीच्या ठिणग्या समोरील जंगलात पोचल्याने आग नियंत्रणात आणण्यासाठी वनखात्याच्या अधिकाऱ्यांनीही महत्वाचे योगदान दिले. सदर घटनेत जिवीतहानी टळली असली तरी शेजारील पेट्रोलपंपला मात्र धोका कायम आहे.
अग्निमशामकसह शेकडो बंब पाणी, फोमचा फवारा
फोंडा अग्निशामक दलासह राज्यभरातून कुडचडे, मडगाव, वेर्णा, कुंडई, पणजी, ओल्ड गोवा येथून सुमारे 12 अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले होते. उत्तर गोव्यातून आग आटोक्यात आणण्यासाठी खास टर्न टेबल लॅडर (टीटीएल) यंत्रणा असलेले वाहन मागविण्यात आले होते. आग आटोक्यात आणण्यात शेकडो बंबसह हजारो लिटर फोमचा वापर करण्यात आला. फोंडा अग्निशामक दलाने काशीमठ, युनायटेड स्पीरीट बेतोडा, म्हार्दोळ, बांधकाम खात्याच्या टॅकरसह पाणी पुरविल्यामुळे महत्चाची मदत झाली. उशिरा रात्रीपर्यंत अग्निशामक दलाचे मतदकार्य जोमाने सुरू होते. हा भंगारअ•ा मुंबईस्थित एका अगरवाल नामक व्यक्ती भाडयाने चालवित असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. आग नेमकी कशामुळे लागली याचा शोध अग्निशामक दल घेत आहे.
घर की भंगारअ•ा? परवाना मिळतोच कसा?
प्राप्त माहितीनुसार भंगारअ•ा कवळे पंचायत क्षेत्राच्या हद्दित आहे. कवळे येथील ग्रामस्थांनी दिवसेंदिवस धोकादायक बनलेल्या बेकायदेशीर भंगार अ•याबद्दल चिंता व्यक्त केली होती. ‘प्रशासन तुमच्या दारी’ कार्यक्रमात बेकायदेशीर भंगार अ•dयाचा मुद्दा उपस्थित झाला होता. उपजिल्हाधिकाऱ्यानी फोंडा मामलेदार, पंचायत सचिव आणि पंचायत मंडळाच्या उपस्थितीत अधिकाऱ्यांना तपासणीसाठी नोटीस बजावली होती. या भागात एकूण 16 पेक्षा जास्त भंगारअ•s बेकायदेशीरित्या कार्यरत असून आपल्या मालाची थेट विक्री केंद्रेही भंगारअ•याला जोडून थाटलेली आहेत. भंगार अ•s भाड्याने देण्यात काही स्थानिक गुंतलेले आहेत. त्यानी आपले भंगार अ•s वाचविण्यासाठी न्यायालयात धाव घेतली असल्यामुळे सदर प्रकार न्यायप्रविष्ट आहे. कोणतीही हालचाल सद्या करता येत नसल्याने पंचायत मंडळही हतबल झालेले आहे. अग्निशामक दलाचे संचालक नितीन रायकर घटनास्थळी दाखल झाले होते. उपसंचालक राजेंद्र हळदणकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्टेशन अधिकारी सुशील मोरजकर तसेच महत्वाचे मदतकार्य केले.
आमदार सुदिन ढवळीकर घटनास्थळी दाखल
आगीची वार्ता वाऱ्यासारखी पसरली तेव्हा वीजमंत्री सुदिन ढवळीकर घटनास्थळावर दाखल झाले. त्यांनी संपूर्ण घटनेचा आढावा घेतला. अग्निशामक दलाचे संचालक नितीन रायकर व फायर फायटरचे कौतुक केले. सदर घटना ही मानवनिर्मित असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. भंगार अ•s फोफावण्यात सर्व सरकारी यंत्रणा कारणीभूत असल्याचे संकेतही त्यांनी दिले असून येत्या आठ दिवसात कवळे पंचायत क्षेत्रातील बेकायदेशीर भंगारअ•s हटविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. काल 5 मे रोजी फोंडा पालीकेसाठी निवडणूक होती नेमक्या त्dयाच दिवशी अचानक महामार्गावरील भंगारअ•dयावर आग लागून अग्नितांडव घडले. सर्व सरकारी यंत्रणेला या आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी धाव घ्यावी लागते. निर्वाचन अधिकारी तथा उपचिल्हाधिकारी रघुराज फळदेसाई, सहाय्यक निर्वाचन अधिकारी विमोद दलाल, अतिरिक्त जिल्हधिकारी विशाल कुंडईकर, पोलीस निरीक्षक विजयकुमार चोडणकर, वाहतूक पोलीस निरीक्षक कृष्णा सिनारी घटनास्थळी दाखल झाले होते. मागील विधानसभा निवडणुकीच्या आदल्या दिवशी 13 फेब्रु. 2022 रोजी धुमरे कवळे येथील एका गोदामवजा घराला आग लागून सुमारे 1 कोटी रूपयाच्या मालमत्तेची हानी झाली होती. त्याच धर्तीवर काल नेमक्या पालिका निवडणुकीच्या दिवशी अशी भीषण आगीच्या घटना घडल्यामुळे संशय व्यक्त करण्यात येत आहे. दोन्ही घटनेत जिवितहानी झालेली नाही. फक्त मालमत्तेची हानी झालेली आहे. त्यामुळे ‘मॅन मेड डिजास्टर’ असल्याची प्रतिक्रीय काही नागरिकांनी दिली आहे.









