राज्यभरात ओपीडी, नॉन इमर्जन्सी सेवा बंद राहण्याची शक्यता
प्रतिनिधी/ बेंगळूर
बेंगळूरसह राज्यभरातील सरकारी ऊग्णालयांमध्ये ओपीडी आणि आपत्कालीन नसलेल्या सेवा (नॉन इमर्जन्सी) बंद राहण्याची शक्मयता आहे. कारण सरकारी निवासी डॉक्टर स्टायपेंड वाढीच्या मागणीसाठी सोमवारपासून आंदोलन करणार आहेत. सकाळी 10 वाजता बेंगळूर येथील फ्रीडम पार्क येथे हे आंदोलन करण्यात येणार असून जोपर्यंत सरकार आपल्या मागण्या पूर्ण करत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
सरकारी निवासी डॉक्टर सोमवारपासून आंदोलन करणार आहेत. स्टायपेंड वाढीच्या मागणीसाठी डॉक्टर बेंगळूरमध्ये रस्त्यावर उतरणार आहेत. सरकारला मागणी पूर्ण करण्यासाठी रविवारपर्यंतची मुदत देण्यात आली होती. मात्र, मुदत संपूनही सरकारने मागणी पूर्ण केली नाही. या पार्श्वभूमीवर ते सोमवारपासून आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. दरम्यान, बेंगळूरमधील व्हिक्टोरिया आणि बोअरिंगसह सर्व सरकारी वैद्यकीय ऊग्णालयांमध्ये आजपासून सरकारी निवासी डॉक्टर कामावर अनुपस्थित राहण्याची शक्मयता आहे. उद्या फक्त आंतरऊग्ण आणि आपत्कालीन सेवा उपलब्ध होण्याची शक्मयता आहे.
फ्रीडम पार्कवर आंदोलन
सोमवारी सकाळी 10 वाजता बेंगळूरच्या फ्रीडम पार्कवर आंदोलन करण्यासाठी डॉक्टर सज्ज झाले आहेत. सुमारे 6 हजार निवासी डॉक्टरांनी कामावर हजर न राहण्याचा निर्णय घेऊन या आंदोलनात उतरले आहे. आज 4200 पीजी डॉक्टर, 2500 इंटर्न डॉक्टर, 70 सुपर स्पेशालिटी डॉक्टर या आंदोलनात सहभागी होणार आहेत. सध्या प्रथम वर्षाच्या पीजी डॉक्टरांना 45 हजार, द्वितीय वर्षाच्या पीजी डॉक्टरांना 50 हजार, तृतीय वर्ष 55 हजार स्टायपेंड मिळत आहे.









