हुपरी(वार्ताहर)
दुधगंगा नदीवर कर्नाटक, महाराष्ट्र मधील अनेक गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी जॅकवेल बांधण्यात आलेले आहेत. सुळकुड जवळ नदीपात्रात रेंदाळ गावाच्या पाणी पुरवठा योजनेचे जॅकवेल बांधले आहे. नदीपात्रात पाण्याचा साठा कमी असल्यामुळे रेंदाळ गावाला आठ ते दहा दिवस पाणी मिळाले नाही. त्यामुळे नागरिकांचे पाण्याविना हालाहाल होत आहे. याकरिता बंधाऱ्यातुन नदीला पाणी सोडण्यासाठी वारंवार अधिकाऱ्यांची भेट घेऊन,पाठपुरावा करूनही अधिकाऱ्यांनी नदीपात्रात पाणी सोडले नाही.
एवढे सांगून देखील पाणी सोडत नसल्याने रेंदाळ येथील समाजसेवक ,ग्रामपंचायतीचे सदस्य महेश कोरवी यांनी दुधगंगानदीवरील सुळकुड जॅकवेलवरच अशा धगधगत्या उन्हातच सकाळपासून ठिय्या आंदोलनास सुरुवात केली. सहा तासाच्या आंदोलनानंतर पाटबंधारे विभागाचे सहाय्यक अभियंता नितीन भोजकर यांनी मुख्य अधिकारी यांना या घटनेसंदर्भात माहिती दिल्यानंतर बंधाऱ्यातुन पाणी सोडून एमटेक मधून तात्काळ पाणी पुरवठा वाढवला.त्यानंतर जँकवेल सुरळीतपणे चालू होऊन पाणी पुरवठा सुरू झाला.
दरम्यान, सलग सहा तास उन्हात नदीवरील सुळकुड जॅकवेलवर आंदोलन करत उपोषणास बसलेले ग्रामपंचायत सदस्य महेश कोरवी यांनी आंदोलन मागे घेतले. यावेळी अधिकारी नितीन भोजकर, ग्रामपंचायत सदस्य गजानन वाईंगडे ,कार्यकर्ते उपस्थित होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









