विनोद सावंत, कोल्हापूर
विवाह नोंदणीतील एजंटगिरीला आता लगाम बसला आहे. घरबसल्याच ऑनलाईनने विवाह नोंदणी करण्याची सुविधा सुरू झाली आहे. यामुळे महापालिकेत विवाह नोंदणीसाठी फेऱ्या मरण्याची गरज नाही. घरबसल्याचा प्रमाणपत्र मिळण्याची सुविधा सुरू झाली आहे. नवीन ई गव्हर्नन्स सिस्टीममुळे हे शक्य झाले आहे.
कोल्हापूर महापालिकेचे छत्रपती शिवाजी मार्केटमधील चौथ्या मजल्यावर विवाह नोंदणी कार्यालय आहे. बँका, आधारकार्ड, पासपोर्ट आदी शासकीय कामांसाठी विवाह नोंदणी अत्यावश्यक असते. नोंदणी नसल्यामुळे भविष्यामध्य अनेक अडचणीला समोरे जावे लागू शकते. यामुळे महापालिकेच्या विवाह नोंदणी कार्यालयात नेहमी नोंदणीसाठी गर्दी दिसून येते. कोरोनामुळे विवाह नोंदणी कार्यालय अनेक दिवस बंद होते. यामुळे नोंदणीची प्रक्रियेला ब्रेक लागला होता. यानंतर नोंदणी करण्यासाठी वेटींग करावे लागत होते. विवाह नोंदणी कार्यालयात गर्दी होऊ नये, नागरिकांना ताटकळत बसावे लागू नये म्हणून विवाह नोंदणी कार्यालयाने अपॉईमेंट सिस्टीम सुरू केली. विवाह नोंदणीसाठी वेटींग करावे लागत होते.
महापालिकेने 1 मे रोजी नवीन ई गव्हर्नन्स सिस्टिम सुरू केली आहे. यामध्ये महापालिकेच्या अनेक सेवा ऑनलाईन केल्या आहेत. महापालिकेच्या वेबसाईटसह मोबाईल अॅपच्या माध्यमातून घरबसल्या मनपाच्या सेवांचा लाभ घेणे शक्य झाले आहे. यामध्ये विवाह नोंदणी कार्यालयाचाही समावेश आहे. आता घरबसल्या विवाह नोंदणी करणे शक्य झाले आहे.
नागरिकांची एजंटगिरीतून सुटका
मनपाच्या कार्यालयात वारंवार फेऱ्या माराव्या लागू नयेत तसेच शासकीय कामासाठी विवाह नोंदणी तत्काळ हवी असल्याने काहीजण एजंटकडे जातात. 600 रूपयांचा येणाऱ्या खर्चासाठी 3 हजार ते पाच हजार रूपये मोजले जातात. यामुळे विवाह नोंदणीत एजंटगिरी सुरू झाली होती. आता या एजंटगिरीला लगाम लागणार आहे.
विवाह नोंदणी कटकट संपली
विवाह नोंदणी प्रमाणपत्र घेण्यासाठी नागरिकांना महापालिकेच्या फेऱ्या माराव्या लागत होत्या. कार्यालयात जाऊन प्रथम फॉर्म घेऊन जाणे. फॉम भरून कागदपत्र कार्यालता जाऊन जमा करणे, कार्यालयाकडून जी मिळेल ती नोंदणीची तारीख घेणे, अपाईमेंट दिवशी साक्षीदारासह कार्यालयात जाऊन नोंदणी करणे. प्रमाणपत्र घेण्यासाठी पुन्हा कार्यालयात जाणे अशा पाच ते सहा वेळा फेऱ्या माराव्या लागत होत्या.ऑनलाईनमुळे हा ताप कमी झाला आहे.
घरबसल्या अशी करा विवाह नोंदणी
कोल्हापूर महापालिकेच्याच्या वेबसाईटवर जाणे.
नागरी सुविधा येथे क्लिक करणे.
लॉगीन करणे.
विवाह नोंदणी फॉर्म भरणे.
अपॉईमेंटची तारीख निवडणे.
विवाह नोंदणी कार्यालयात जावून फोटो व सही करून येणे.
ऑनलाईन आलेले सर्टीफीकेट डाऊनलोड करून प्रिंट काढणे.
विवाह नोंदणीसाठी 40 अर्ज
नवीन ई-गव्हर्नन्स सिस्टीममुळे महापालिकेचे कामकाज ऑनलाईनने सुरू झाले आहे. या ऑनलाईन प्रणालीद्वारे 580 मिळकतधारकांनी कराचा भरणा केला आहे. विवाह नोंदणी प्रमाणपत्रासाठी 39 नागरिकांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे. मनपाच्या संकेतस्थळावर 18 हजार 73 नागरीकांनी भेट दिली असून यामध्ये 601 नागरिकांनी संकेतस्थळावर नोंदणी केलेली आहे. 522 नागरिकांनी मोबाईल अॅप डाऊनलोड केले आहे.
Previous Articleमहापालिका ‘सोसायटी’चे बिगुल वाजले,प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध
Next Article अवघ्या चार लोकांचे शहर









